अहमदनगर ब्रेकींग: हात ऊसणे दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- हात ऊसणे पैशाची मागणी करणार्‍या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. राजु मारूती कासार (वय 22 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे.

राजु कासार याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा जम्या शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोठला परिसरातील घासगल्लीमध्ये ही घटना घडली. राजु याने जम्याला हात ऊसणे पैसे दिले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राजुने जम्याच्या घासगल्ली येथील घरासमोर जावून हात ऊसणे दिलेल्या पैशांची मागणी केली.

याचा राग जम्याला आल्याने त्याने राजुला शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केले. जम्याची पत्नी राजुला म्हणाली,‘‘ तु जर परत पैसे मागण्यास आला तर मी तुझ्यावर केस दाखल करील’’. असे म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक आप्पा तरटे करीत आहेत.