अहमदनगर ब्रेकींग: वडा खरेदीवरून झालेल्या वादात तरूणाचा खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : वडापाव खरेदीवरून झालेल्या वादात एका तरूणाचा खून झाल्याची घटना नवनागापूरात घडली. प्रविण रमेश कांबळे (वय 35 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी सुरू होते. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

प्रविण कांबळे हा मंगळवारी नवनागापूरातील एका वडापाव गाडीवर वडा घाण्यासाठी गेला होता. त्याला वडापाव 20 रूपयाला असल्याचे सांगितल्यानंतर त्याने पाच रूपये कमी करण्यास सांगितले.

त्यावरून वडापाव दुकानदार व प्रविण यांच्यात वाद झाले. या वादात प्रविणला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.