वीजचोरी केल्या प्रकरणी एकास न्यायालयाने दिली 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरी केल्या प्रकरणी एकास दोषी धरून नऊ हजार 196 रुपये दंड अथवा 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

किसन यशवंतराव डोंगरे (रा. एमआयडीसी परिसर, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एमआयडीसी कनिष्ठ अभियंता प्रकाश रामचंद्र शेळके व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी 4 जुलै 2013 रोजी सकाळी एमआयडीसी,

अहमदनगर येथील रहिवासी भागात वीज चोरी तपासणी केली. किसन डोंगरे यांनी महावितरण कंपनीच्या मीटरला दिलेल्या वायरला कट करून तेथे दुसरी की वायर जोडून (बायपास करुन) वीज चोरी करताना आढळून आले.

दोन पंचांसमक्ष वीज पुरवठा तोडून वीजचोरीसाठी वापरलेली वायर जप्त करण्यात आली. डोंगरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत प्रणालीशी अनधिकृतपणे छेडछाड करून वीज चोरून वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीस साडेनऊ हजार रूपये दंड किंवा 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.