Ahmednagar News :- डायल ११२ मुळे वाचले एकाचे प्राण…’या’तालुक्यातील घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- नागरिकांना आपतकाली परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी.या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रणालीमुळे आज एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचविण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्ह्यात वारंवार मारहाण , भांडण तंटा यांसारख्या घटना घडत असतात. याबाबत तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जावुन पिडितांना मदत मिळवून देता येते.

त्याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सुरु असलेल्या डायल ११२ प्रणालीमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थित मदत मिळते.

काल डायल ११२या प्रणालीवर गंगाराम रामदास ढगे (रा .रांजणगाव मशीद ता .पारनेर) यांनी त्यांच्या फोनवरुन फोन केला की , ”मी आता माझ्या शेतात असुन आयुष्याला कंटाळलो आहे व शेतातील झाडाला फाशी घेत आहे”असे फोनवर सांगितले.

ही माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंगाराम रामदास ढगे यांस ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलावुन घेवुन पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी त्यांचे नातेवाईकांसमक्ष समोपदेशन करुन त्यांना आत्महत्येपासुन परावृत्त केले.