किरकोळ कारणावरून एकावर केले थेट कोयत्याने ‘वार’..!’या’ तालुक्यातील घटना : एकजण गंभीर जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-   शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर बंद करत असताना शिवीगाळ केल्याने त्यास समजावण्यास गेलेल्या एकास तिघांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एकाने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत सविस्तर असे की तालुक्यातील देवदैठण येथे आनंदा नारायण बनकर हे आपल्या शेतात असलेल्या विहिरीवरील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांना केशव बाळू बनकर याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याला शिवीगाळ करू नको असे सांगत समजावत असताना तेथे केशव याचा भाऊ वैभव बाळू बनकर आणि बहीण राधिका बाळू बनकर (सर्व रा.देवदैठण) हे आले.

या तिघांनी मिळून आनंदा बनकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी केशव याने आपल्या हातातील कोयत्याने आनंदा यांच्या डोक्यात वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आनंदा बनकर हे गंभीर जखमी झाल्याने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.