कर्जतकरांना जाणवतोय मोकाट जनावरांचा त्रास; प्रशासन मात्र गप्प

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  शहर असो वा गाव मोकाट जनावरे हे सगळीकडे पाहायला मिळतात. यातच अनेकदा या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होत असतात.(Ahmednagar news)

यामुळे नागरी समस्यां देखील निर्माण होतात. अशाच काही समस्यां आता कर्जतकरांना जाणवू लागल्या आहेत. कर्जत शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कित्येक वर्षानंतरही कायमच आहे.

मोकाट जनावरांमुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बसस्थानक परिसर, बाजारतळ तसेच इतर अनेक गल्ल्यांमध्ये मोकाट जनावरांचा वावर असतो. अनेकदा ही जनावरे रस्त्यावर येतात. त्याचा प्रवाशांना मोठा त्रास होतो.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. दरम्यान नुकतेच कर्जत शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अशा अनेक शासकीय योजना प्रभावीरीत्या राबवल्या जात आहेत.

मात्र मोकाट जनावरांकडून शहरात अस्वच्छता केली जात आहे. काही जनावरे रोगट असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर कोंडवाड्यासह इतर कायमस्वरूपी अशा प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.