कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीसोबत तरूणाने केले गैरकृत्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime  :- कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीचा तरूणाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर घडली.

या प्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा तरूण शुभम शंकर काकडे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी फिर्यादी युवती पारनेर तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. गुरूवारी सायंकाळी युवती व तिचे मित्र-मैत्रीण कॉलेज संपल्यानंतर बसने पारनेर येथून अहमदनगर शहरातील नेप्ती नाका येथे आले.

तेथून युवती तिच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना शुभम काकडे याने तिला बालिकाश्रम रोडवर दुचाकी आडवी लावली. तो तीला म्हणाला, ‘तु माझ्याशी का बोलत नाही? असे म्हणून त्याने डावा हात पकडून विनयभंग केला.

‘तु माझ्याशी बोलली नाही तर मी तुला त्रास देईल’, अशी धमकी देवुन शिवीगाळ करत तो तेथून निघुन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.