जलसेतू कामाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामांची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली.

जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या आहेत .

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची ही पाहणी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली .यावेळी समवेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड माधवराव कानवडे, सिताराम पा. गायकर ,जि.प.सदस्य रामहरी कातोरे,

मिलिंद कानवडे, मीनानाथ पांडे ,दादा पा. वाकचौरे ,अशोकराव भांगरे, भास्कराव आरोटे ,बाळासाहेब नाईकवाडी, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे ,अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूलमंत्री थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू व उजव्या कालव्यावरील दिवसरात्र सुरू असलेली कामांचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत हे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ही त्यांनी यावेळी समजावून घेतल्या.

क्रेनच्या साह्याने अधिकाऱ्यांसमवेत जेलसेतूवर जाऊन केली पाहणी

निळवंडे धरणाच्या विश्रामगृहावर ही अधिकाऱ्यांसमवेत महसूलमंत्री ‌श्री.थोरात यांनी बैठक घेतली. या प्रसंगी बोलताना महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत.

येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर च्या काळामध्ये दोन्ही कालव्यांना पाणी सोडता येईल. याकरिता आपल्या सर्वांना काम करायचे आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या कालव्याच्या कामासाठी कायम सहकार्य केले आहे .

शासन स्तरावर काही अडचणी असल्यास आपण ती प्राधान्याने सोडवू. दुष्काळी भागातील जनतेला लवकरात लवकर पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी ही त्यांनी समजावून घेतल्या.

कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.