राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने आता लवकरच प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदांचे आरक्षण एका क्लीकवर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत सुरु आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचनेचा मुद्दा, राज्यातील सत्तांतर त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळं राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

अशातच आता जिल्हा परिषदांच्या आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. पहा आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले.

ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
अहमदगर :अनुसूचित जमाती
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
पुणे : सर्वसाधारण
सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
सांगली :सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
औरंगाबाद : सर्वसाधारण
बीड : अनुसूचित जाती
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती
जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग
लातूर : सर्वसाधारण( महिला)
हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
अमरावती : सर्वसाधारण (महिला)
अकोला : सर्वसाधारण (महिला)
यवतमाळ : सर्वसाधारण
बुलढणा : सर्वासाधारण
वाशिम : सर्वसाधारण
नागपूर अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)