Ahmednagar City News : आता अहमदनगर शहरातील गुंडगिरी, दहशत ही थांबली पाहिजे – आमदार बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : अनेक वेळेस नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या एका मुख्याध्यापकांवर हल्ला होतो. यातून नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे, हे चित्र त्यामुळे आणखी स्पष्ट झालं आहे. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट घडलेली आहे. आता नगरची गुंडगिरी, दहशत ही थांबली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात म्हणाले, नगर हे जिल्ह्याचे शहर आहे. राज्यातील ही एक प्रमुख शहर आहे. इथे जे गुंडगिरीचा वातावरण वाढतं आहे, त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. याचा आग्रह विधानसभेत धरला होता. सरकार आणि पोलीस दलाच्या प्रमुखांशी ही बोललो होतो. तरी हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होतो. हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आ. थोरात पुढे म्हणाले, नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातल्या प्रमुख ठिकाणी आणि विद्यालयांच्या ठिकाणी चाललेले अवैध धंदे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

नगर शहरात हे एवढं उघडपणे शैक्षणिक संस्थांच्या जवळ चालतं. ही नगरला शोभा देणारी गोष्ट नाही. प्रशासनानं अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिजे, अनिस चूडीवाला, प्रताप शेळके पाटील, संपतराव म्हस्के, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील क्षेत्रे, उषाताई भगत राणीताई पंडित, सुनिता भाकरे, जरीना पठाण, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे,

आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, फैयाज शेख, मयूर भिंगारदिवे, किशोर कोतकर, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अरुण मस्के, जयंत वाघ, अॅड. माणिक मोरे, शरद गुंजाळ, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे, विश्वनाथ निर्वाण, अजित वाडेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.