जिल्ह्यातील आधार धारकांनी आधार अद्यावतीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar New:भारत सरकारच्या आधार नोंदणी व अद्यतन विनीयम, 2022 नुसार ज्या आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही,

अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार धारकांची आधार माहिती अद्यावत करणे बाकी असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार धारकांची आधार माहिती अद्यावत (Document Update) करणे बाकी आहे.

नागरिकांना आधार माहितीचे अद्यावतीकरण करण्यासाठी आपल्या नजीकच्या आधार केंद्रांमध्ये समक्ष जाऊन अद्यावतीकरण करता येईल. अथवा नागरिकांना स्वतः myAadhaar Portal द्वारे माहितीचे Online अद्यावतीकरण करता येईल..

जे आधार धारक माहिती अद्यावतीकरण (Document Updation) हे myAadhaar Portal https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटद्वारे करतील त्यांना दि. 15 मार्च 14 जुन, 2023 या तीन महिन्यांसाठी अद्यावतीकरण मोफत राहील. अहमदनगर जिल्हयातील सर्व नागरिकांनी वरील दोन पर्यायांद्वारे आपल्या आधार माहितीचे अद्यावतीकरण तातडीने करुन घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.