काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेत केली आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते.

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली खा. विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत संवाद साधला. यावेळी नगर शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी खा. विखे यांच्याशी चर्चा केली.

याबाबत अधिक माहिती देताना किरण काळे म्हणाले की, नगर – पुणे इंटरसिटी रेल्वे हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

यामुळे ही दोन शहरे अधिक जवळ येऊ शकणार आहेत. खा. विखे जरी भारतीय जनता पार्टीचे नेते असले तर देखील ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत.

त्यामुळे खासदार या नात्याने त्यांची भेट घेऊन नगरकरांच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे त्यांचे लक्ष आम्ही काँग्रेसच्या वतीने वेधले आहे. भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू अनेक महत्त्वाचे स्वातंत्र्यसंग्रामातील नेते नगर शहरामध्ये मोठ्या कालावधीसाठी कैदेत होते. त्यामुळे या किल्ल्याला मोठा इतिहास आहे.

आज संरक्षण खात्याच्या ताब्यात असणारा हा किल्ला नागरिकांना पाण्यासाठी दररोज खुला नसतो. यामुळे नगर शहराचा भुईकोट किल्ल्याच्या माध्यमातून अपेक्षित असणारा पर्यटन विकास होऊ शकत नाही.

त्यामुळे या किल्ल्याची कस्टडी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्याची देखील मागणी आम्ही खा. विखे यांच्याकडे केली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.