अमरधाम येथील वाढीव गाळे ठराव बेकायदेशीर; डॉ. चिपाडे यांनी दिले आयुक्तांना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- अमरधामच्या जागेभोवती गाळ्यांची संख्या वाढविण्यापेक्षा येथे सुशोभीकरण करून दिवाबत्ती आणि इतर आवश्यक सुविधा देण्याबाबत मागणी करणारे महत्वाचे निवेदन डॉ. योगेश रमेश चिपाडे (अध्यक्ष, इंद्रायणी प्रतिष्ठान) यांनी दिले आहे.(amc news)

आयुक्त शंकर गोरे यांना याबाबतचे निवेदन देतानाच याबाबत ठोस कार्यवाही करून स्थायी समितीचा बेकायदेशीर तातडीने रद्द न केल्यास महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा डॉ. चिपाडे यांनी दिला आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अमरधाम म्हणजे नगरकरांच्या दुःखात सेवा देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळालेली संधी. मात्र, आपल्या नगर शहरातील नालेगाव येथील प्रमुख अमरधामची दुरवस्था हा काळजीचा विषय आहे.

शहरातील रस्ते जसे खड्डेमय झाले आहेत; पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या जशा समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्याच पद्धतीने अमरधाम या महत्वाच्या आणि नगरकरांसाठी भावनिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या

जागेचीही दुरवस्था झालेली आहे. इथे दिवाबत्ती आणि पाणी याची सोय करतानाच सुशोभीकरण आवश्यक आहे. मात्र, हा मुद्दा सोडून या जागेवर गाळे बांधकाम करून

ते सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नगरसेवक व नेत्यांच्या घशात घालण्याचा दुर्दैवी खेळ आता सुरू झाला आहे. कोणालाही याबाबत माहिती होणार नाही अशी काळजी घेऊन स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव झाला आहे.

आपल्याला गाळे मिळवण्यासाठी गाळ्यांची संख्या वाढवून घेण्याचा हा डाव आहे. महापालिकेला यातून भाड्याचे पैसे मिळतील असे कारण यासाठी दिले जात आहे.

त्याचवेळी महापालिकेच्या ताब्यातील अनेक जागा, मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमध्ये मागणी असतानाही त्या भाडे तत्वावर देण्याचे टाळले जात आहे.

त्यामुळे अशा पद्धतीने नगरकरांची फसवणूक करणारा आणि जागा बळकवण्याचा प्रयत्न असलेला हा बेकायदेशीर ठराव तातडीने रद्द करण्यात यावा.

तसेच अमरधाम विकासाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नगरसेवक व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. आम्ही याबाबत हे निवेदन देत असून यावर तातडीने कार्यवाही होऊन येथील वाढीव गाळ्यांचा ठराव बेकायदेशीर असल्याने तातडीने करण्याची मागणी डॉ. चिपाडे यांनी केली आहे.