निधी मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवित; ऐतिहासिक इमारतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील ती प्रसिद्ध ऐतिहासिक इमारत बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डासाठी इमारत बांधून दिली होती.

हीच लोकल बोर्डाची इमारत नंतर जिल्हा परिषद इमारत झाली. या जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची आवश्‍यकता आहे. या कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

या प्रयत्नांना आता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची साथ मिळणार आहे. शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक जिल्हा परिषदेत एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती.

त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक इमारतीचे बारकाईने निरीक्षण केले. मनोज पाटील आणि भोसले साहेब यांच्यात इमारतीच्या डागडुजीबाबत हळू आवाजात गप्पा चालू होत्या. असे तेथील उपस्थितांनी सांगितले.

लोकल बोर्डानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. अशा या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुमारे पाच कोटींची मागणी या कामासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचा विषय सर्वांसमोर आलेला आहे.

शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदी उपस्थित होते.

शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक जिल्हा परिषदेत एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी केली.

इमारतीच्या डागडुजीबाबत निधी संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले या इमारतीला निधी मिळवून देण्यासाठी आपले सहकार्य राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले दिले.