पंकजा मुंडे आर्थिक अडचणीत, कार्यकर्ते कोट्यवधी रुपयांच्या मदतीला तयार, अहमदनगरमधील ‘ती’ पोस्ट प्रचंड व्हायरल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीएसटी विभागाने त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांच्या साखर कारखान्यातून १२०० कोटी रुपयांचे कर्ज थकवल्या प्रकरणी जप्तीची कारवाई केली आहे.

जीएसटी विभागाने १९ कोटी रुपयांचा कर न भरल्याची नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे आपल्या कारखान्याला मदत करण्याची विनंती केली होती. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. पंकजा ताईंनी जाहीरपणे याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यानंतर पंकजाताई समर्थक एकवटल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या बीडयेथील परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) कारवाई केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, या कारखान्याशी भावनिक नाते आहे. अहमदनगरमधील पाथर्डी येथील पंकजा समर्थक अमोल गर्जे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. ताई साहेबांनी आदेश दिल्यास मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला आपण कितपत मदत करू शकतो, असा सवाल गर्जे यांनी केला आहे.

* लाखो रुपयांच्या मदतीला समर्थक तयार

अमोल गर्जे यांच्या या पोस्टवर पंकजा समर्थकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ताईंकडून आदेश आल्यास लाखो रुपयांची मदत करू, अशी प्रतिक्रिया पंकजा समर्थकांनी दिली आहे. आपण कमेंटमध्ये किती मदत करू शकतो याची आकडेवारीही अनेकांनी दिली आहे. ही पोस्ट सध्या बीड आणि अहमदनगरमध्ये व्हायरल होत आहे.

अमोल गर्जे यांच्या पोस्टवर पंकजा मुंडे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांनी हाक केल्यास एक लाख रुपयांची मदत करू, असे काही समर्थकांनी सांगितले आहे. सर्वांनी मदत केल्यास आम्ही १०० कोटी रुपये गोळा करू,

असे एका समर्थकाने सांगितले. ‘१९ कोटी चिलर आहेत. ११९ कोटी रुपये जमा होतील. फक्त निर्णय घ्यायचा आहे. आदेश द्यावा,’ अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकाने केली.

काही समर्थकांनी तर आपण पंकजा यांच्या आदेशाची वाट का पाहतोय, प्रत्येक गावातून 1 कोटी तरी जमा होतील”, असं म्हटलय. अनेक समर्थकांनी 1 हजार पासून 11 हजार पर्यंतची मदत करू असाही म्हटलं आहे.