रंगपंचमीचा रंग बेरंग, १४ वर्षीय मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- सर्वत्र रंगपंचमी आनंदाने साजरी होत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- ऐनतपुर शिवारात रंगपंचमीचा रंग खेळायच्या नादात बंधाऱ्यात बुडून 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर-ऐनतपूर शिवारातील अशोक बंधाऱ्यामधील पाण्यात रंग खेळण्याच्या नादात विशेष महेंद्र शिवदे(वय 14 वर्ष,रा-बेलापूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे

दुपारी दोन वाजयेच्या सुमारास ही घटना घडली असून हा मुलगा इयत्ता आठवी मध्ये शिकत होता.आज रंगपंचमी असल्याने रंग आणि पाणी खेळण्यासाठी मुले या बंधारा परिसरात गेली होती.

तेव्हा तोल जावुन पाण्यात पडल्याने विशेष या मुलाचा मृत्यू झाला.या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.