अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करताना व्यापारी अधिकृत असल्याचे तपासून आपला माल विक्री करण्याचे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, सचिव अरुण आभाळे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कांदा पिकाच्या काढणीला वेग आला आहे. कांदा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतावर व्यापाऱ्यांचे पिक आले आहे. शेतकरी वर्गाची फसवणूक होण्याच्या तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत.

मात्र शेतकरी ज्या व्यापाऱ्यास माल विकतो तो अधिकृत व्यापारी आहे का, याची शहानिशा करत नाही, त्याच्याकडून खरेदी बिलाच्या अधिकृत पावतीची मागणी करत नाही. त्यामुळे तो खरंच अधिकृत व्यापारी आहे, याची शहानिशा होत नाही.

कांदा खरेदी करताना जे वजन काटे वापरले जातात ते अधिकृत आहेत का? किंवा पाच ते सहा गोणीचे वजन करून सरासरी वजन धरले जाते. त्यातून किती वजनात फसवणूक होते. याचा विचार करत नाही. शिवाय मालाची किंमत हि बाजार भावानुसार आहे की नाही,

याची शहानिशा करत नाही. हे बांधावर खरेदी करणारे व्यापारी शेतकरी वर्गाची दिशाभूल करून बाजार भावापेक्षा रूपया जास्त देवून खरेदी केल्याची उदारणे आहेत. हे जादा बाजार कसे देतात, याचाही विचार शेतकरी करत नाहीत. शिवाय मालाचे पेमेंट रोख देत नाहीत.

पंधरा दिवसाचे पोस्ट पेड चेक दिले जातात. मात्र पेमेंट त्या तारखेला मिळेल याची खात्री नसते. गावातील एखाद्या शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला जातो आणि इतर लोकांना मात्र पेमेंट वेळेत न मिळाल्याच्या तक्रारी असतात. हे सर्व टाळायची गरज आहे. त्यासाठी बाजार समितीत माल विक्रीस आणावा. जेणेकरून भविष्यात फसवणूक होणार नाही.

बाजार समिती कांदा पिकांसाठी सद्या अकोले बाजार समितीत तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी हित लक्षात घेऊन कोतुळ उपबाजारात लिलाव करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपण आपला माल जवळच्या बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे