भंडारदऱ्याच्या काच बंगल्याचे सौंदर्य हरपले : जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या ब्रिटीशकालीन काच बंगल्याची वाताहात झाली आहेत. सौंदर्य हरपल्याने बंगला शेवटची घटका मोजत आहे. या बंगल्याला पुन्हा सौंदयं प्राप्त करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच असणारे दगडी धरण समजले जाते. या घरणाची निर्मिती ब्रिटीशांनी १९२६ रोजी केली धरणाच्या निर्मितीपासुन ते धरण पुणं होईपर्यंत ब्रिटीशांना राहण्यासाठी धरणापासुन काही अंतरावर एक निवासस्थान उभारले गेले होते

तर दुसर्‍या निवासस्थानाची निर्मिती भंडारदरा धरणाच्या भिंतीवरच केली गेली होती. धरणावरील विश्रामगृहाला फर्स्ट क्लास बंगला किंवा काच बंगला तर दुसर्‍या विश्रामगृहाला सॅकड क्लास बंगला असे संबोधण्यात येत असे.

या बंगल्यामधील सेंकड क्लास बंगल्याचा फक्त सांगाडाच उभा असुन फर्स्ट क्लास बंगल्याचे सौंदर्य हरपले आहे. या बंगल्याभोवती फुलझाडांचे ताटवे उभे होते. बंगल्याच्या आवारात आंब्याच्या झाडांची आमराईच तयार झाली होती.

अनेक मोठाले वृक्ष बंगल्याची शोभा वाढवत होते, तर सभोवतालचा परिसर हिरवाईने नटला होता. बंगल्याच्या देखरेखीसाठी धरण शाखेच्या कर्मचार्‍यांचा राबता होता. झाडांना कायमस्वरुपी पाणी दिले जात असल्याने झाडांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसुन येत होता. बंगल्यावर अनेक मोठ मोठे अधिकारी मुक्कामी थांबत होते. आमदार, खासदारांचा हा बंगला आवडता होता, आता मात्र या बंगल्याचे सौंदर्य हरपल्याचे दिसुन येत आहे. फुलझाडांचे ताटवे गायब झाले आहे. कुठेतरी दोन तीनच आंब्यांची झाडे दिसत आहेत.

बंगल्याच्या अवती भोवती असणाऱ्या झाडा- झुडपांवरही कुऱ्हाड ‘चालविल्याचे दिसुन येत आहे. बंगल्यावर दिवस पाळीला एक व रात्रपाळीला एक असे दोनच कर्मचारी असल्याने झाडांना पाणी देण्यासही येथे माणुस उपलब्ध दिसत नाही. त्यामुळे फुलझाडांसह इतरही झाडांनी माना खाली टाकल्या आहेत. बंगल्याच्या परिसरातील बागच नाहिशी झाली आहे. बंगल्याच्या आवारात मात्र बागेतील फुलझाडांना हात लावु नये, असा फलक डौलाने उभा आहे. हा काच बंगला भंडारदरा धरणाची शान समजला जात होता.

आता मात्र हाच बंगला खायला उठल्यासारखा वाटत आहे. कधीतरी एखादा पाहुणा या बंगल्यावर मुक्कामाला दिसतो. पावसाळ्यात या बंगल्याचा वापर दारुच्या पार्यासाठी सर्रास वापरला जात असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळेस बंगल्यासह बंगल्याचा परिसर हा पूर्णपणे काळोखात असल्याचे दिसते.

या बंगल्याच्या दुरवस्थेला जलसंपदा विभाग जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे बंगल्याकडे लक्ष नाही. बंगल्याला खेटुन धरणाचा जलसाठा आहे. धरन शाखेकडे कर्मचारी कमी असले तरी काही कर्मचारी रोज झाडांना पाणी देण्यासाठी दोन तास कामाला लावले, तरी पुन्हा या बंगल्याचे दिवस परत वायला वेळ लागणार नाही.