अहमदनगरच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या दलालास मार्केटमध्ये कायमची बंदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड या शेतकऱ्याला पुणे येथील मार्केटयार्ड परिसरामध्ये एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती.

त्यानंतर पुणे मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे व करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर मार्केट कमिटीच्या प्रशासनाने संबंधित दलालास मार्केटमध्ये येण्यास कायमचा मज्जाव केल्याने टाळे ठोकण्याचा इशारा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती अँड पालवे यांनी दिली आहे.

मारहाणीची घटना घडून दोन दिवस उलटल्यानंतरही संबंधित दलालावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाथर्डी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

संबंधित अडत्यावर दोन दिवसात कारवाई करून त्यास अटक करण्यात यावी, अन्यथा पुणे मार्केटला शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अँड सतीश पालवे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफीक शेख यांनी दिला होता.

शेतकऱ्याला मारहाण करून आरेरावी करणाऱ्या दलाला यापुढे पुणे मार्केट कमिटीत पाय ठेवू दिला जाणार नाही अशी ग्वाही मार्केट कमिटीच्या प्रशासनाने दिल्यानंतर मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचा इशारा स्थगित करण्यात आला असल्याचे अँड पालवे यांनी सांगितले.