शासनाने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे- आमदार डॉ. तांबे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:समाजाच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान असणारे शिक्षण क्षेत्र आहे या क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध मागण्या अडचणी यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत

त्यामुळे गुणवत्ता व आधुनिक शिक्षण प्रणाली याकरता शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने सोडवावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे.

अहमदनगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर बैठक झाली. यावेळी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षण अधिकारी अशोक कडूस ,शिक्षक भारतीचे सुनील गाडगे ,आप्पासाहेब जगताप, समीर शेख, साहेबराव कुटे ,जयंत भाबड आदी उपस्थित होते. यावेळी आमदार तांबे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे.

शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त आणि कामे असतात तीही कमी झाली पाहिजे .त्यामुळे गुणवत्ता वाढेल तसेच त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्याकरता प्रशासनाने पुढाकार घेऊन ते तातडीने मार्गी लावले पाहिजे. यावेळी झालेल्या बैठकीत शिक्षण उपसंचालकांनी म्हणाले की, सातव्या वेतन आयोगाचा थकित दुसरा हप्ता शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना मिळण्यासाठी अनुदान मागणी करण्यात येईल.

शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर निवड श्रेणी असल्याने गैरप्रकार होणार नाही .यासाठी काळजी घेऊ. भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी वेतन पथक कार्यालय सूचना देण्यात आल्या असून निवडणूक व जनगणनेशिवाय शैक्षणिक कामे देऊ नये.

मुख्याध्यापकांच्या पदोन्नती रखडलेल्या प्रश्न येत्या 15 दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या वेळी प्रशिक्षण की दोन हजार रुपये परत देण्यात येतील सर्व सेवकांची सेवा पुस्तके अद्यावत ठेवण्यासाठी नोव्हेंबर पर्यंत कार्यवाही करण्यात येईल यांचं विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी मान्य केले.

आमदार डॉ तांबे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीमुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांचा शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लागणार असल्याने शिक्षकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे