‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतराचा ठराव मंजूर..! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले. यावेळी सर्व लढ्यात सहभागी झालेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी उपसभापती महिला व बालकल्याण महानगरपालिका कलावती शेळके, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ, सागर बोरुडे, नितीन बारस्कर, धनगर सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने,

भाजपचे निशांत दातीर, प्रा. बाळासाहेब शेंडगे राजेंद्र पाचे काकासाहेब शेळके, सूर्यकांत तागड, जितेंद्र पाचरणे संतोष तागड, सुमित कुलकर्णी, सचिन चितळकर, संतोष गावडे, ऋषिकेश ढवण, प्रशांत कासार, ज्ञानेश्वर भिसे, वसंतराव दातीर, प्रवीण गवळी, संजय भोजने, ज्ञानेश्वर तागड, शामसुंदर कसबे, ज्ञानेश्वर तागड, गणेश कजबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंददायी निर्णय

नगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जिल्ह्याला लाभलेला असून, त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे.

त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य महान आहे. त्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो. अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर शहराला मिळाल्याने ही बाब आनंदायी आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

अहिल्यादेवीच्या कार्याला सलाम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या अतुलनिय कार्याला खऱ्या अथनि महायुतीच्या सरकारने एकप्रकारे सलामच केला आहे. आजचा दिवस सोनेरी अक्षरात लिहून ठेवणाराच आहे. अशी प्रतिक्रिया आ. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी चौडी येथे झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमात अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली होती. समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता मंत्रीमंडळ बैठकीत नामंतराचा मुद्दा एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.