‘भोजापूर’चा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्याऱ्यांनी आपले अपयश मान्य करावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : वर्षानुवर्षे भोजापूर चारीचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्यांनी या प्रश्नाचे केवळ राजकारण केले. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा ३५ वर्षे तुम्ही आमदार आहात, हा प्रश्न मार्गी लावण्यात आलेले अपयश मान्य करा, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.

तालुक्यातील तिगाव येथे भोजापूर चारीच्या कामाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते काल गुरूवारी (दि. १४) झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर तळेगाव येथे बिरोबा देवस्थानच्या मंदिर परिसर विकासाचा शुभारंभ आणि कौठे कमळेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपुजन महसूलमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारी, ग्रामस्थ संख्येने होते.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी चारीच्या कामाचे कोणी किती भूमीपुजन केले हा इतिहास जनतेला माहित आहे. या चारीच्या कामासाठी कोणी किती ठेकेदार नेमले हा सुद्धा इतिहास जनता जाणून असल्याने आता पुन्हा भूमीपूजन करून दिशाभूल करू नका. या भागातील शेतकऱ्यांना पाणीच मिळू द्यायचे नाही ही तुमची भूमिका असल्याची टीका त्यांनी आ. थोरात यांच्यावर केली.

राज्यात महायुतीचे सरकार आल्- यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. आता भोजापूर चारीचा प्रश्नही महायुती सरकारच सोडवेल, अशी ग्वाही देवून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी या चारीच्या कामाला आलेला निधी कुठे गेला याची चौकशी करावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

भोजापूर चारीच या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. या चारीचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण करा, अशा सूचना आधिकाऱ्यांना देताना भोजापूर धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याबाबत आधिकाऱ्यांची बैठक घेवून लवकरच निर्णय करु, असे आश् वासन त्यांनी दिले.

कौठे कमळेश्वर येथे मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक गुंतवणूक ही आरोग्य क्षेत्रात केली आहे. सामान्य माणसाला हाकेच्या अंतरावर आरोग्य सुविधा मिळावी, हीच यामागील भूमिका आहे. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु करुन, मोफत उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य सरकारनेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध् यमातून मोफत उपचारांना गती दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

याप्रसंगी आदर्श शिक्षक तसेच आशा सेविक उद्योजकांचा सन्मान मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला योजनेचा लाभ मिळवून दिला जात असून एक रुपया पीक विमा योजनेतून संगमनेर तालुक्याला २५ कोटींचा लाभ झाला आहे. किसान सन्मान योजनेतून तालुक्याला ७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सरकारने सुरु केली. मात्र सहकारी दूध संस्थानी अद्यापही शेतकऱ्यांची माहिती विभागाला दिली नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. सरकारवर टिका करणाऱ्यांनी आपल्या कृतीत आधी बदल करावा, असा टोला त्यांनी लगावला.

युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आता महत्वाचा असून, शिर्डी येथे शेती महामंडळाच्या जमीनीवर निर्माण होणारी औद्योगिक वसाहत ही रोजगारासाठी उपयुक्त ठरणार आहे. तळेगाव येथील महिला बचत गटांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करुन, बचत गटाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देणार आहे. बिरोबा देवस्थानच्या परिसराचा विकास करुन, तिर्थक्षेत्र पर्यटन विकासाला जिल्ह्यात निधी उपलब्ध दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.