नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी : आमदार मोनिकाताई राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोरडगावच्या विकासकामासाठी नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी दिला. परीसारातील रस्ते, पिण्याचे पाणी, जलसंधारणाची कामे, शाळाखोल्या, सभागृह, वीज यासाठीचा निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोरडगाव, कोळसांगवी येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे हभप प्रविण महाराज व नवनाथ महाराज कोरडगावकर उपस्थित होते.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष डॉ. मुत्युजंय गजें होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, भाजप ओबीसी तालुकाध्यक्ष अशोक गोरे, नारायण तात्या काकडे, कोरडगावचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, मधुकरराव देशमुख, भाऊसाहेब काकडे, गहिनीनाथ बोन्द्रे,

काकासाहेब देशमुख, स्वराज बोन्द्रे स्वप्निल काकडे, प्रमोद काकडे, बाळासाहेब मुखेकर, बबन मुखेकर, गोटु मुखेकर, श्री. औसरमल, जगन्नाथ घुगरे, एम.डी काकडे, भारत किलबिले, विठ्ठल गाडे, विठ्ठल मुखेकर, सरपंच सुरेखा फुंदे, उपसरपंच दादासाहेब घुले, युवराज घुले,

बळीराम काकडे, संदीप काकडे, ज्ञानोबा घुले, दगडु धनवडे, कविता घुले, कौशल्या साळवे, बबन घुले, द्रौपदी गाडे, ग्रामसेविका जी.एल. सांगळे, रेवुबाई साळवे उपस्थित होते. यावेळी आभार रोहीत देशमुख व दादासाहेब घुले यांनी मानले. धामणगाव, खरवंडी, चुंभळी, मंचरवाडी, हंडाळवाडी, कोरडगाव व कोळसंगावी येथे विविध विकास कामांचे उद्घाटने व लोकार्पण गुरुवारी दिवसभर करण्यात आले.

कोळसांगवी ग्रामपंचायतीने दुर्धर आजाराने पिडीत व्यक्ती व ज्या घरात मुलीच आहेत त्या कुटुं बाला आर्थिक मदत करणे, मुलींच्या नावाने ठेव ठेवणे अशा योजना सुरु करुन तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

सरपंच सुरेखा फुंदे व उपसरपंच दादासाहेब घुले यांच्या कार्याचे कौतुक आमदार राजळे यांनी केले आहे. कोळसागंवी ग्रामपंचायतीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे आवाहन देखील आ. राजळे यांनी केले.