नगर तालुक्यातील ‘या’ महिला सरपंच आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित….!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सरपंच प्रियंका अजय लामखडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यापूर्वी सरपंच त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली,

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, खासदार अमरसिंह पाटील, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी,

आमदार निलेश लंके, युवा उद्योजक अजय लामखडे यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्यदलातील अधिकारी, सिने कलाकार उपस्थित होते. निंबळक गावच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना.

महिला सरपंच असून देखील सर्वांना सोबत घेत केलेला गाव विकास. निंबळक ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये घेतलेले विविध ऐतिहासिक निर्णय,

ठराव तालुक्याला आदर्श असे ठरलेले आहेत. कोरोना काळात केलेले कार्य या सर्वांची दखल घेऊन त्यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या लामखडे या तालुक्यातील पहिल्याच सरपंच ठरलेल्या आहेत.