घरात बसून आरक्षण मिळणार नाही; एकीची ताकद दाखवून लढाई सुरुच ठेवा – आ. गोपीचंद पडळकर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : घरात बसून आरक्षण मिळणार नाही तर आता सर्वांनी बाहेर पडून मोर्चे, आंदोलने करुन महाराष्ट्रात धनगरी ताकद काय आहे ‘ती’ दाखवा. धनगर आरक्षणचा लढा उभारला गेला की, एन. टी. चे पिल्लू बाहेर काढण्याचे षडयंत्र पवार रचत असल्याची टिका भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केली.

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जय मल्हार मंगल कार्यालयात काल शुक्रवार (दि. १३) दुपारी ४ वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने जागर यात्रा मेळाव्यात पडळकर बोलत होते.

याप्रसंगी आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडण्यात आलेली असून शपथपत्रही दाखल करण्यात आलेले आहे.

आपण आरक्षणाच्या जवळ आलेलो आहोत. मात्र समाजाने एकजुट दाखविण्याची गरज असून घरात बसून आरक्षण मिळणार नसल्यामुळे रस्त्यावरची लढाईही सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी करुन आपल्याला एक लाख टक्के आरक्षण मिळणार असल्याचा ठाम विश्वासही यावेळी पडळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी गेल्या साठ-सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नसून धनगर समाजाला आरक्षण मिळवून देवून मग इतर आदिवासी जमातीचे केवळ दहा टक्के लोकच या आरक्षणाचा लाभ घेत असल्यामुळे इतर अन्यायग्रस्त जमातीला आरक्षण मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे आ. पडळकर यांनी स्पष्ट केले.

एक लाख टक्के धनगर समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आशावाद आ. गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त करुन रस्त्यावरची लढाईही सुरूच ठेवून धनगरी ताकद दाखविण्याचे आवाहन करत समाजाला एकत्र येण्याचे आवाहन आ. गोपीचंद पडळकर यांनी केले.