7 seater car : तब्बल 20 किमी मायलेजसह येणाऱ्या ‘गरिबांची इनोव्हा’ कारची डिलिव्हरी सुरू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 seater car : ‘गरिबांची इनोव्हा’ म्हणून ओळख असणाऱ्या Renault Triber या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इनोव्हा घेणे प्रत्येक भारतीयाला शक्य नाही. कारण या कारची किंमत 25 लाखांच्या घरात आहे. परंतु तुम्ही Renault ची Triber ही कार स्वस्तात खरेदी करू शकता.

दरम्यान नवीन नियमानुसार कंपनीकडून Kiger आणि Triber AMT मॉडेल्सची डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. कंपनीने यात 20 किमी मायलेज दिले आहे. जर तुम्ही कमी किमतीत 7-सीटर कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

सेफ्टी फीचर्स

माहितीनुसार, नवीन नियमांच्या आधारे कंपनीकडून या कारमध्ये सेफ्टी फीचर्स वाढवले आहेत. नवीन ग्राहकांना यामध्ये वक्र रस्त्यांवर चांगल्या नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम, तसेच कार रोल-बॅक चढ-उतार टाळायचा असेल तर हिल स्टार्ट असिस्ट (HSA) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम यांसारखी भन्नाट फीचर्स मिळतील.

मिळणार रिअल-टाइम अलर्ट

या कारला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम मिळत असून जी कमी हवा किंवा पंक्चर झालेल्या टायरसाठी रिअल-टाइम अलर्ट देते. दरम्यान कंपनीची Renault Kiger ही एक कॉम्पॅक्ट SUV कार असून यात 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.0-लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात येतो.

मायलेज

Renault Triber बाजारात 6.33 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असून या कारमध्ये एकूण 8 प्रकार उपलब्ध आहेत जे 999 सीसी इंजिनसह येतात. कंपनीच्या या कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. कारच्या इंजिनची पॉवर क्षमता 71.01 Bhp असून जे 20.0 kmpl पर्यंत मायलेज देते. तर हे लक्षात घ्या की 7 सीटर बहुउद्देशीय कारचा ग्राउंड क्लीयरन्स 182 मिमी आहे ज्यामुळे अपघात कमी होतो.

काय आहे ESP?

ज्यावेळी तुम्ही कार चालवत असताना ती अचानक वळण घेते किंवा अचानक ब्रेक लावते, त्यावेळी ESP कारच्या वेगवेगळ्या चाकांना समान ब्रेक लावण्याऐवजी गरजेनुसार कमी किंवा जास्त ब्रेक लावून कारला घसरण्यापासून वाचवत असते. इतकेच नाही तर कार स्टार्ट केल्यानंतर चालकाने गाडी सोडताच हे फीचर्स सक्रिय होते. हे स्पीड सेन्सर्सद्वारे कारच्या वेगावर तसेच स्टीयरिंगवर लक्ष ठेवत असते. त्यामुळे ज्यावेळी ही कार नियंत्रण गमावू लागते त्यावेळी ते त्यावर नियंत्रण ठेवू लागते.