Best SUV In India : टाटा पंचला विसरा ! स्वस्तात घरी आणा ‘ही’ मोठी आणि दमदार एसयूव्ही ; मिळणार ‘इतके’ भन्नाट फीचर्स 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best SUV In India :  सध्या भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सची लोकप्रिय आणि स्वस्त एसयूव्ही टाटा पंच धुमाकूळ घालताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात आज टाटा पंचची खरेदी करत आहे. यामुळे देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीमध्ये टाटा पंचचा समावेश झाला आहे.

मात्र आता टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये एका दमदार एसयूव्हीची एन्ट्री झाली आहे.  जे टाटा पंच पेक्षा स्वस्तात तुम्ही खरेदी करू शकतात आणि ही एसयूव्ही टाटा पंच पेक्षा मोठी देखील आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आम्ही येथे  निशानची मॅग्नाइट एसयूव्हीबद्दल बोलत आहोत ही एसयूव्ही तुम्हाला टाटा पंचच्या समान किंमत रेंजमध्ये मिळते आणि ती टाटा पंच पेक्षा मोठी आहे. चला मग जाणून घेऊया या दमदार आणि मस्त एसयूव्हीबद्दल संपूर्ण माहिती.

Nissan Magnite ची किंमत 5.97 लाख ते 10.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. टाटा पंचची किंमतही 6 लाख रुपयांपासून सुरू होते. दोन्ही 5 सीटर पर्यायात येतात. मॅग्नाइट दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह विकले जात आहे, एक 1.0L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क) आणि 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन (100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क/100PS आणि 152Nm टॉर्क). दोन्ही इंजिनांना 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅन्डर म्हणून मिळतो तर टर्बो इंजिनसह CVT गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. मॅग्नाइट पेट्रोल (मॅन्युअल) 20 kmpl चे मायलेज देते तर पेट्रोल (ऑटोमॅटिक) 17.7 kmpl चे मायलेज देते.

फीचर्सच्या बाबतीत, यात 360-डिग्री कॅमेरा, 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay सह), एअर प्युरिफायर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, अॅम्बियंट लाइटिंग आणि क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :- LIC Scheme : काय सांगता ! फक्त 150 रुपयांत मुलांचे भविष्य होणार सुरक्षित ; ‘या’ योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक,  फायदे जाणून व्हाल थक्क