Bike News: बजाजची ‘ही’ शानदार बाईक मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! वाचा या बाईकची किंमत आणि ईएमआय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bike News:- भारतामध्ये दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये हिरो, होंडा तसेच बजाज या कंपन्या खूप प्रसिद्ध आहेत. या तीनही कंपन्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी मॉडेल्स बाजारात आणलेले असून  ग्राहकांच्या देखील मोठ्या प्रमाणावर ते पसंतीस उतरलेले आहेत.

या अनुषंगाने जर आपण बजाज या कंपनीचा विचार केला तर या कंपनीने अनेक परवडण्याजोग्या किमतींमध्ये दुचाकी उपलब्ध करून दिलेल्या असून अगदी बऱ्याच वर्षापासून बजाज एमएटी च्या रूपाने लोकांनी बजाजच्या बाईकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. याच दुचाकी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या बजाज कंपनीने  124.4 सीसी इंजिन असलेली बजाज CT 125X अप्रतिम अशी बाईक बाजारात आणलेली आहे व हीचा स्टायलिस्ट लूक खूप आकर्षक आहे. याच बाईक विषयी आपण या लेखात माहिती घेऊ.

 बजाजची CT 125X बाईकची वैशिष्ट्ये

बजाजच्या या बाईक चा पावरफुल इंजिनचा विचार केला तर कंपनीने या बाईकमध्ये १२४.४ सीसी सिंगल सिलेंडर, चार स्ट्रोक, एअर कुल्ड  SOHC, DTSi इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 8000 RPM वर 10.9 ps ची कमाल पावर आणि 5500 RPM वर 11Nm पिक टॉक जनरेट करते. या गाडीचे मायलेज बघितले तर एका लिटरमध्ये 60 kmpl चे मायलेज देते.

तसेच या बाईकची रचना पाहिली तर पुढच्या बाजूला फोर्क कवर गिअर्स सोबत टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागच्या बाजूला ड्युअल स्प्रिंग लोडेड शॉक एबसॉर्बर दिलेले आहे. तसेच मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आणि  CBS सह ड्रम/ डिस्क युनिट आहे. तसेच या बाईकला 17 इंचाचे ट्यूबलेस टायर असून आलोय व्हील देण्यात आलेले आहेत. ही बाईक होंडा एसपी 125 तसेच टीव्हीएस रायडर 125 हिरो सुपर स्प्लेंडर इत्यादी बाईकला तगडी टक्कर देऊ शकते.

 बजाजच्या या बाईकची किंमत आणि ईएमआय योजना

कंपनीने या बाईकची एक्स शोरूम किंमत ७४ हजार १६ रुपये ठेवले असून ऑन रोड किंमत ८८९४३ रुपये आहे. जर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन बाईक घ्यायचे असेल तर तुम्हाला बँक 9.7% वार्षिक व्याजदराने 79 हजार 943 रुपये कर्ज देऊ शकते. त्याकरता तुम्हाला नऊ हजार रुपये डाऊन पेमेंट भरावे लागेल व पुढील तीन वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला 2568 चा ईएमआय प्रति महिना भरावा लागेल.