Royal Enfield : एकच नंबर..! लवकरच येणार ‘Royal Enfield’ची सर्वात स्वस्त बाईक, एवढी असेल किंमत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Royal Enfield : रॉयल एनफिल्डच्या बाईकचे नाव घेताच पहिला शब्द मनात येतो तो म्हणजे रॉयल्टी, रॉयल एनफिल्ड बाईकची वेगळीच क्रेज पाहायला मिळते. या बाईकचा एक मोठा चाहता वर्ग देखील आहे. सध्या तरुणांमध्ये ही बाईक सर्वात लोकप्रिय आहे. जितकी दर्जेदार ही बाईक आहे तितकीच ती महाग देखील आहे. सर्वसामान्य माणसाला न परवडणारी ही बाईक सर्वांनाच घेता येईल असे नाही.

पण सध्या ऑटो मार्केट वाईट टप्प्यातून जात आहे. केवळ रॉयल एनफिल्डच नाही तर देशातील ऑटोमोबाईल बाजाराचा वेग जवळपास मंदावला आहे. अशा परिस्थितीत वाहन उत्पादक नवीन आणि कमी किमतीची वाहने सादर करण्याचा विचार करत आहेत. अशातच Royal Enfield देखील 250 cc क्षमतेची स्वस्त बुलेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

जुलै महिन्यातील कंपनीच्या विक्रीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास, रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात 22 टक्क्यांच्या घसरणीसह 54,185 मोटारसायकली विकल्या. एक वर्षापूर्वी जुलैमध्ये कंपनीने 69,063 मोटारसायकली विकल्या होत्या. कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे.

नवीन सुरक्षा आणि इंजिन मानकांनुसार बाईकचा वाढता उत्पादन खर्च, पाहता कंपनीला बाईकच्या किमती वाढवण्यास भाग पाडले जात आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईक Royal Enfield Bullet 350 ची ऑन-रोड किंमत आधीच 1.45 लाख रुपये ओलांडली आहे, जी वेळोवेळी वाढत आहे.

अशातच सामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कंपनी 250 सीसी इंजिन क्षमतेची बाईक बाजारात आणणार आहे. ज्याची किंमत कमी असेल. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने आपल्या निवेदनात म्हटले होते की, “आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी येत्या काळात बाईकचे नवीन प्रकार देशात लाँच करणार आहोत.”

या विधानामुळे वाहन क्षेत्रात नवीन अटकळ निर्माण झाली आहे. रॉयल एनफिल्डची ही आगामी बाईक कंपनीच्या प्रसिद्ध मॉडेल बुलेट 350 वर आधारित असेल, असे तज्ञांचे मत आहे. याशिवाय कंपनी ही बाईक 1.20 लाख रुपयांपासून लॉन्च करू शकते. मात्र, या बाईकचे तंत्रज्ञान आणि इतर वैशिष्ट्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.