Car Finance Plan : मस्तच.. 1 लाख रुपये भरून घरी न्या 16.9 kmpl चे मायलेज देणारी Hyundai Creta, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Finance Plan : Hyundai Creta कंपनीची खूप यशस्वी कारपैकी एक आहे. ही आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री करणारी कार राहिलेली आहे. या सेगमेंटमध्ये लोक आता खूप पसंत करत आहेत. ग्राहकांना या कारचा लूक, किंमत, मायलेज खूप आवडत आहे. 1 लाख रुपये भरून तुम्ही ही कार घरी नेऊ शकता.

तुम्हालाही जर Hyundai Creta आवडली असल्यास ती खरेदी करायची असल्यास तर ही SUV खरेदी करण्यासाठी तिची किंमत, इंजिन तपशील, मायलेज आणि वैशिष्‍ट्ये जाणून घ्या.

जाणून घ्या किंमत

हे Hyundai Creta चे बेस मॉडेल आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 10,87,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे जी 12,71,253 रुपये ऑन-रोड पर्यंत जाते.

जाणून घ्या फायनान्स प्लॅन

समजा Hyundai Creta चे बेस मॉडेल कॅश पेमेंटद्वारे विकत घेतल्यास तुमचे बजेट जवळपास 13 लाख रुपये इतके असणे गरजेचे आहे. तुम्ही एवढी मोठी रक्कम एकाच वेळी खर्च करू शकत नसल्यास आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे केवळ 1 लाख रुपये भरून ही SUV खरेदी करू शकता.

फायनान्स प्लॅनची ​​गणना देणार्‍या ऑनलाइन कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 1 लाख रुपये असल्यास या रकमेच्या आधारे बँक 11,71,253 रुपयांचे कर्ज देते. त्याशिवाय त्यावर व्याज आकारण्यात येईल. हे कर्ज वार्षिक ९.८ टक्के दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

समजा कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला Hyundai Creta साठी 1 लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला 24,771 रुपयांचा मासिक EMI भरावा लागणार आहे.

जाणून घ्या इंजिन आणि मायलेज

Hyundai Creta मध्ये इंजिन 1497 cc देण्यात आले आहे जे 63,00 rpm वर 113.18 bhp ची पॉवर आणि 45,00 rpm वर 143.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. मायलेजबाबत कंपनीचा असा दावा आहे की Hyundai Creta 16.9 kmpl चा मायलेज देत असून हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

फीचर्स

Hyundai Creta मध्ये Android Auto, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, अलॉय व्हील्स, Apple CarPlay सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच फॉग लाइट्स, समोरच्या सीटसाठी ड्युअल एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक अशी फीचर्स देण्यात आली आहेत.