Hyundai Exter SUV : 27 Kmpl मायलेज देणाऱ्या Exter SUV ची सर्व व्हेरियंट आणि त्यांच्या किमती एका क्लिकवर पहा इथे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Exter SUV : ह्युंदाई मोटर्सकडून गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांची Exter एसयूव्ही कार भारतात लाँच केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि CNG पर्याय देण्यात आला आहे. कारची किंमत देखील कंपनीकडून खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

तुमचेही बजेट कमी असेल आणि एसयूव्ही खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ह्युंदाई मोटर्सची मायक्रो एसयूव्ही Exter सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter X, S, SX, SX ऑप्शनल आणि SX ऑप्शनल कनेक्ट अशा पाच व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार सादर केल्यापासून कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्युंदाई Exter वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या Exter एसयूव्ही कारमध्ये लक्झरी फीचर्स दिले आहेत. Exter एसयूव्ही कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 60 कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल, सनरूफ, ड्युअल. कॅमेरा डॅशकॅम, रेन सेन्सिंग वायपर अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर पार्किंग कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Exter इंजिन आणि मायलेज

Exter एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83 Ps पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. कारचे मॅन्युअल व्हेरियंट 19.4 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर ऑटोमॅटिक व्हेरियंट 19.2 kmpl मायलेज देते. तसेच Exter एसयूव्ही कारचे CNG व्हेरियंट 27.1 Kmpl मायलेज देते.

Hyundai Exeter च्या सर्व प्रकारांच्या किमती

Exter X मॅन्युअल – 6 लाख रुपये
Exter EX ऑप्शनल मॅन्युअल – 6.35 लाख रुपये
Exter S मॅन्युअल – 7.37 लाख रुपये
Exter S पर्यायी मॅन्युअल – 7.52 लाख रुपये
Exter S ऑटोमॅटिक – 8.10 लाख रुपये
Exter SX मॅन्युअल – 8.10 लाख रुपये
Exter S सीएनजी मॅन्युअल – 8.33 लाख रुपये
Exter SX DT मॅन्युअल – 8.34 लाख रुपये
Exter SX ऑप्शनल मॅन्युअल – 8.74 लाख रुपये
Exter SX ऑटोमॅटिक – 8.77 लाख रुपये
Exter SX DT ऑटोमॅटिक – 9.02 लाख रुपये
Exter SX सीएनजी मॅन्युअल – 9.06 लाख रुपये
Exter SX ऑप्शनल ऑटोमॅटिक – 9.41 लाख रुपये
Exter SX ऑप्शनल कनेक्ट मॅन्युअल – 9.43 लाख रुपये
Exter SX ऑप्ट कनेक्ट DT मॅन्युअल – 9.58 लाख रुपये
Exter SX ऑप्शनल कनेक्ट ऑटोमॅटिक – 10 लाख रुपये
Exter SX ऑप्शनल कनेक्ट DT ऑटोमेटेड – 10.15 लाख रुपये

ह्युंदाईच्या मायक्रो Exter एसयूव्ही कारच्या वरील सर्व किमती या एक्स शोरूम आहेत. कारच्या ऑन रोड किमती वेगळ्या आहेत.