Hero Passion Plus : ३ वर्षानंतर मोठ्या बदलांसह हिरोने पुन्हा लॉन्च केली स्वस्तातील बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Passion Plus : Hero MotoCorp ही एक देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक दुचाकी भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. तसेच कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन दुचाकी लॉन्च केल्या जात आहेत.

हिरो कंपनीच्या दुचाकींना बाजारपेठेत अधिक मागणी आहे. तसेच हिरो कंपनीच्या दुचाकींचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कंपनीकडून दुचाकीमध्ये अनेक नवनवीन फीचर्स दिले जात आहेत तसेच त्यांची किंमत देखील कमी असल्याने अनेकजण या हिरो कंपनीच्या दुचाकीकडे आकर्षित होत आहेत.

हिरो कंपनीकडून आता त्यांची जुनी बाईक पॅशन प्लस पुन्हा नवीन रूपात लॉन्च केली आहे. कंपनीकडून तब्बल ३ वर्षानंतर त्यांची पॅशन प्लस बाईक पॉवरफुल इंजिनसह लॉन्च केली आहे. तसेच या बाईकचा लूक देखील जबरदस्त देण्यात आला आहे.

कंपनीकडून या बाईकच्या किमतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. हिरो कंपनीकडून या बाईकची एक्स-शोरूम किंमत ७६,३०१ रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून या बाईकचे उत्पादन २०२० मध्ये बंद करण्यात आले होते. मात्र आता तीन वर्षानंतर कंपनीकडून पुन्हा एकदा ही बाईक नवीन अवतारात लॉन्च करण्यात आली आहे.

नवीन पॅशन प्लस बाईक

हिरो कंपनीकडून सुरुवातीला पॅशन प्लस बाईक लॉन्च केल्यानंतर लोकांचाही चांगला प्रतिसाद या बाईकला मिळाला होता. जेव्हा कंपनीकडून ही बाईक लॉन्च करण्यात आली होती तेव्हा ही बाईक सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली होती.

मात्र कंपनीकडून काही कारणास्तव या बाईकचे मॉडेल बंद करण्यात आले होते. मात्र आता बाईकच्या बॉडी पॅनल्सवर काही नवीन ग्राफिक्स निश्चितपणे समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ही बाईक एकूण तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे, स्पोर्ट रेड, ब्लॅक नेक्सस ब्लू आणि ब्लॅक हेवी ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.

हिरो कंपनीकडून या बाईकमध्ये पूर्वीप्रमाणेच 97.2 सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.89 एचपी पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते.

बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन 4-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, इंजिन आता नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांनुसार अपडेट केले गेले आहे. कंपनीने या बाइकमध्ये त्यांचे खास i3S स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान देखील वापरले आहे.

नवीन पॅशन प्लस बाईकमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही चाकांना 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकचे एकूण वजन 115 किलो आहे. तसेच ही बाईक 100 सीसी सेगमेंटमधील सर्वात वजनदार बाईक आहे.

या बाईकमध्ये इलेक्ट्रिक-स्टार्ट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रिअर शॉक शोषक बाईकमध्ये वापरण्यात आली आहेत.