Honda New Bike : स्प्लेंडरचा होणार खेळ खल्लास ! बाजारात एन्ट्री करणार होंडाची ‘ही’ स्वस्त बाइक ; किंमत असणार फक्त ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda New Bike : कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाइक खरेदीचा तुम्ही देखील विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आणखी काही दिवस प्रतीक्षा करू शकतात. भारतीय बाजारात 15 मार्चला Honda Motorcycle Scooter India आपली नवीन परवडणारी बाइक लाँच करणार आहे.

ही बाइक ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेज ऑफर करणार आहे. कंपनीकडून या नवीन बाइकची आज घोषणा करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही बाइक भारतीय बाजारात Hero Splendor ला टक्कर देणार आहे. नवीन बाइकची आज घोषणा करताना कंपनीने एक टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये बाइकच्या संभाव्य डिझाइनची झलक दिसली आहे.

या नवीन टीझर व्हिडिओमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगिल बाइकच्या आगमनाची घोषणा करताना दिसत आहे, “कम खर्च और ज्यादा चर्चा, आ रही है होंडा की सौ.” असं टिझर आहे . आम्ही तुम्हाला सांगतो सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Deluxe Dream सर्वात स्वस्त बाइक आहे ज्याची किमती रु.71,133 पासून सुरू होते. मात्र ही आगामी बाइक यापेक्षाही स्वस्त असू शकते असे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/honda2wheelerin/status/1631587720249360386?s=20

 

100cc सेगमेंट देशात खूप लोकप्रिय आहे आणि या सेगमेंटमध्ये Hero Splendor ला सर्वाधिक पसंती आहे. ही आगामी होंडा बाइक प्रामुख्याने स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करेल असे सांगण्यात येत आहे. जर तुम्ही Honda च्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर, CD 110 Deluxe, SP 125 आणि Shine सारखी मॉडेल्स प्रवाशांच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. देशातील सर्वाधिक ग्राहक असलेला हा विभाग आहे.

सध्याचे CD Deluxe मॉडेल 109.51 cc इंजिन वापरते जे 8.7 bhp पॉवर आणि 9.3 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी आपल्या नवीन बाइकमध्येही हेच इंजिन वापरण्याची शक्यता आहे. साधारणपणे ही बाइक 60 ते 65 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम असते. तथापि, बाइकचे मायलेज मुख्यत्वे रस्त्याची स्थिती आणि ड्रायव्हिंग स्टाइलवर अवलंबून असते. होंडाच्या या नवीन 100 सीसी बाइकची किंमत खूपच कमी असेल आणि अधिक मायलेज देईल.

हे पण वाचा :- IMD Rain Alert : हवामानाचा पॅटर्न बदलणार ! महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 72 तास पावसाचा कहर ; जाणून घ्या सविस्तर