Hyundai Company Fact: ह्युंदाई कंपनीत बनते अवघ्या 12 सेकंदात एक कार! वाचा या कंपनीविषयी काही रंजक गोष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Company Fact:- मारुती सुझुकी नंतर जर देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणाऱ्या कंपनीचा विचार केला तर यामध्ये आपल्याला जागतिक स्तरावरील ह्युंदाई या कंपनीचे नाव घ्यावे लागेल. भारतीय कार बाजारपेठेमध्ये बऱ्याच कालावधीपासून ही कंपनी कारची विक्री करत आहे. जगातील दुसरा सर्वात मोठा कारखाना म्हणून याकडे पाहिले जाते. ह्युंदाई बद्दल अनेक मनोरंजक किंवा महत्त्वाच्या अशा काही बाबी आहेत. याविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 ह्युंदाई कार कंपनीबद्दल काही मनोरंजक गोष्टी

1- ह्युंदाई या ब्रँडच्या नावाचा अर्थ ह्युंदाई हा कोरियन शब्द असून ज्याचा उच्चार कोरियन भाषेमध्ये हांजा म्हणून देखील केला जातो. या शब्दाचा अर्थ आधुनिकता असा होतो. या कोरियन भाषेतील शब्दाच्या आधारावरच या कंपनीचे नाव हुंदाई असे ठेवण्यात आले आहे.

2- ह्युंदाई कारच्या लोगोचा अर्थ जर ह्युंदाई या कंपनीचा लोगो पाहिला तर तो इंग्रजी एच अक्षरासारखा दिसतो. परंतु यामध्ये खरं पाहिलं तर दोन व्यक्ती हात जोडत असल्याचा दाखवणारा हा लोगो आहे. यामध्ये एक हात ग्राहकाचा तर दुसरा हात कार कंपनीचा असतो. म्हणजेच या लोगोच्या माध्यमातून कंपनी आणि ग्राहक यांच्यातील संबंध प्रतिबिंबित होतो.

3- वॉरंटीच्या बाबतीत गेम चेंजिंग ह्युंदाई ही जगातील पहिली कार उत्पादक कंपनी आहे जी तिच्या कारवर दहा वर्ष किंवा एक लाख किलोमीटर वारंटी देते. या बाबतीत सुरुवातीच्या कालावधीत या कंपनीवर बरीच टीका झालेली होती. परंतु कालांतराने इतर वाहन उत्पादक कंपन्यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले व नंतर ह्युंदाई  कंपनीचा हा निर्णय गेम चेंजर म्हणून समोर आला.

4- लागणारे स्टील स्वतःच बनवते जर आपण विचार केला तर आजच्या कालावधीत वाहन उत्पादक कंपन्या लागणारे स्टील इतर कंपन्यांकडून खरेदी करतात व वाहनांची निर्मिती करतात. परंतु हुंदाई हे कंपनी स्वतःचे लागणारे स्टील स्वतः तयार करते व त्याचा वापर कार निर्मिती किंवा कार उत्पादनामध्ये करते. याकरिता कंपनीने दक्षिण कोरियामध्ये स्वतःचा स्टील कारखाना उभारला आहे.

5- जगातील दुसरा सर्वात मोठा कारखाना फोक्सवॅगन नंतर ह्युंदाई कारखाना हा जगातील दुसरा सर्वात मोठा कारखाना आहे. कंपनीने कारखाना दक्षिण कोरियातील उल्सन या ठिकाणी उभारला आहे. 54 दशलक्ष स्क्वेअर फुट क्षेत्रात पसरलेल्या या कारखान्यात 35000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

तसेच यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि एक मालवाहू जहाजाचा देखील समावेश आहे. या कारखान्यांमध्ये पाच वेगवेगळ्या इमारतींमध्ये कार निर्मितीचे काम केले जाते. त्या कारखान्यात कुशल कारागीर आणि अत्याधुनिक मशीनरीच्या साह्याने दर बारा सेकंदाला एक कार तयार होते.

6- कंपनी वाढदिवस देखील करते साजरा ह्युंदाई या कंपनीची स्थापना सोल प्रांतामध्ये 29 डिसेंबर 1967 रोजी झाली होती.  त्यामुळे या कंपनीचा 29 डिसेंबरला वाढदिवस देखील साजरा केला जातो.

7- 90 च्या दशकात हुंडाई सोनाटा होती प्रसिद्ध नव्वदच्या दशकामध्ये जर आपण कोणालाही विचारले तर सर्वात उत्तम सेडान कार कोणती होती असे विचारले तर बहुतेक जण ह्युंदाई सोनाटा असे उत्तर देतील. 1988 मध्ये या कंपनीने सेडान कारची  पहिली आवृत्ती जगात सादर केली होती. कंपनीने बनवलेली ही पहिली कार होती ज्यामध्ये इंजिन वगळता सर्व काही ह्युंदाईने तयार केले होते. आज देखील ह्युंदाईची सोनाटा जगभर प्रसिद्ध आहे.

8- ह्युंदाई कंपनी सामाजिक कार्यात आहे अग्रेसर ही कंपनी केवळ कार निर्मितीमध्ये प्रसिद्ध नाही तर ही एक एनजीओ देखील आहे. या कंपनीचा एनजीओ ह्युंदाई होप ऑन विल्स म्हणून ओळखले जाते व ही संस्था बालरोग आणि कर्करोगाने बाधित मुलांवर उपचार आणि काळजीसाठी निधी पुरवते. कंपनीने ही संस्था 1998 मध्ये इंग्लंडमधील एका डीलरशिप मधून सुरू केली होती व ती आज देखील काम करत आहे.