Hyundai Creta Facelift : ह्युंदाई क्रेटाचा जलवा ! खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, पहा किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या शानदार कार सादर केल्या आहेत. तसेच ह्युंदाई मोटर्सकडून एसयूव्ही कारची वाढती मागणी लक्षात घेता त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत.

ह्युंदाई मोटर्सकडून जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या कारला लॉन्च झाल्यापासून ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या कारने 75,000 युनिट्सचा बुकिंग आकडा ओलांडला आहे.

फेब्रुवारी 2024 च्या सुरुवातीला या कारचे 51,000 युनिट्सचे बुकिंग झाले होते. त्यानंतर 24,000 युनिट्सची अधिक बुकिंग करण्यात आली आहेत. ह्युंदाई क्रेटा कारची आतपर्यंत एकूण 10 लाख युनिट्सपेक्षा जास्त बुकिंग झाले आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट व्हेरियंट आणि रंग पर्याय

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार Abyss Black Pearl, Robust Emerald Pearl, Fire Red, Ranger Khaki, Titan Grey, Atlas White आणि Atlas White with Abyss Black Roof (ड्युअल-टोन) अशा रंग पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O) या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. क्रेटा फेसलिफ्ट कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5-लीटर NA पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचा या कारमध्ये पर्याय देण्यात आला आहे. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड IVT/IMT, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट किंमत आणि वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सने क्रेटा फेसलिफ्ट कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये ठेवली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.15 लाख रुपये आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये लेव्हल 2 ADAS, 6 एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी 3 पॉइंट सीट बेल्ट, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, VSM सह ESC, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल अशी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

क्रेटा एन लाइन कधी होणार लॉन्च

क्रेटा फेसलिफ्टनंतर आता ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा एन लाइन एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. 11 मार्च रोजी भारतात क्रेटा एन लाइन व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये जबरदस्त फीचर्सचा समावेश असेल.