Hyundai Exter EV : ह्युंदाईची इलेक्ट्रिक SUV लवकरच होणार लॉन्च, थेट टाटा पंचला देईल टक्कर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Exter EV : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक कार कंपन्याही यावर वेगाने काम करत आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या पंच इलेक्ट्रिकला खूप पसंती दिली जात आहे. अशा परिस्थितीत Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Exter चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या वाहनाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. जर तुम्ही टाटा पंच इलेक्ट्रिक ऐवजी दुसरा पर्याय शोधत असाल, तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेल, या कारमध्ये तुम्हाला काय खास पाहायला मिळेल जाणून घेऊया…

Hyundai Exeter सध्या पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, Hyundai Exeter EV मध्ये 25-30kWh बॅटरी पॅक मिळू शकतो. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 300-350 किमीची रेंज देऊ शकते. दरम्यान, यासंदर्भात ह्युंदाईकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. Exeter EV अनेक वेळा चाचणी करताना दिसली आहे. तुमच्या माहितीसाठी Hyundai Exeter हे डिझाईनच्या बाबतीत टाटा पंच पेक्षा खूपच चांगले असू शकते.

Hyundai Exter ev च्या डिझाइनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल होणार नाहीत. फक्त किरकोळ बदल पाहिले जाऊ शकतात. याशिवाय फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. एवढेच नाही तर सुरक्षेसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअरबॅग्ज, ईबीडी आणि ब्रेक असिस्टची सुविधा असेल.

कधी लॉन्च होऊ शकते?

नवीन Hyundai Exter ev भारतात या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. Exter EV ची भारतात किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते. ही भारतात थेट टाटा पंच इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.