Mahindra Thar 5 Door या दिवशी होणार लॉन्च ! काय असणार खास? जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही थार लॉन्च केली आहे. मात्र आता कंपनीकडून थार एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल सादर केले जाणार आहे. यामध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.

महिंद्राकडून त्यांच्या थार ऑफ रोडींग एसयूव्ही कारचे 5 डोअर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. महिंद्राकडून त्यांची 5 डोअर थार अनेक नवीन फीचर्स आणि मोठ्या व्हीलबेससह 15 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिंद्राकडून त्यांच्या आगामी 5 डोअर थार लॉन्चबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच कंपनीकडून 5 डोअर थारची लॉन्च तारीख जाहीर केली जाऊ शकते. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत.

5-डोअर महिंद्रा थार वैशिष्ट्ये

महिंद्रा थार 5 डोअर एसयूव्ही कारमध्ये 300 मिमी लांब व्हीलबेस दिला जाईल. 3 डोअर थार एसयूव्ही कारपेक्षा या कारचा व्हीलबेस मोठा असेल. कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल पाहायला मिळेल.

नवीन थार एसयूव्ही कारमध्ये एसी व्हेंट्स, ड्रायव्हर आणि पुढच्या प्रवाशासाठी स्वतंत्र आर्मरेस्ट आणि मागील सीटवर सेंटर आर्मरेस्टचा समावेश असेल. सिंगल-पेन सनरूफ आणि डॅशकॅम फक्त 5 डोअर थारच्या टॉप मॉडेलमध्ये दिले जाईल.

तसेच 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील कारमध्ये दिली जाईल. कारच्या ऑल-ब्लॅक कलर स्कीमऐवजी ड्युअल-टोन ब्लॅक आणि ब्राउन इंटीरियर थीम दिली जाऊ शकते.

5-डोअर महिंद्रा थार डिझाइन

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून थारच्या डिझाईनमध्ये बदल केले जाणार आहेत. 6-स्लॅट ग्रिलच्या विपरीत, 5-डोअर थार सहा-स्लॅट ग्रिलसह सादर करण्यात येईल. नवीन थारमध्ये सर्व-एलईडी लाइटिंग सिस्टम आणि नवीन डिझाईन केलेले आकर्षक अलॉय व्हील्स कारमध्ये दिले जाणार आहेत.

महिंद्रा थार 5-डोअर इंजिन

महिंद्राकडून त्यांच्या नवीन थार एसयूव्ही कारमध्ये 2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.2L टर्बो डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. पेट्रोल इंजिन 200 bhp पॉवर आणि 370Nm/380Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल तर डिझेल इंजिन 370Nm/400Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित गिअरबॉक्ससह नवीन थार उपलब्ध असेल.