Maruti Suzuki च्या ‘ह्या’ कारने मार्केट हलवलं ! डोळे झाकून करत आहे लोक खरेदी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Car : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नेहमीच ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह बेस्ट फीचर्स असणारी कार ऑफर करते. यामुळे दरमहा देशात सार्वधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये मारुतीचे सर्वात जास्त कार्स असतात. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारी 2023 मध्ये देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये 10 पैकी 7 कार्स मारुतीच्या होत्या.

यातच तुम्ही देखील मारुतीची नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही आज तुम्हाला कंपनीच्या एका भन्नाट कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकणार आहे. या कार मध्ये तुम्हाला उत्तम फीचर्ससह जास्त मायलेज देखील मिळणार आहे.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती मारुती सुझुकी बलेनो आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. जानेवारीत तो चौथ्या क्रमांकावर आला असला तरी त्याची विक्री अजूनही चांगली आहे. गेल्या महिन्यात मारुती बलेनोने 16,357 युनिट्स विकल्या जे जानेवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 6,791 युनिट्सपेक्षा 141 टक्के जास्त आहे.

विक्री का वाढली

मारुती बलेनोच्या विक्रीत अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी कंपनीने याला नवीन अवतारात लॉन्च केले. मारुतीच्या नवीन बलेनोमध्ये तुम्हाला आता 360-डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले आणि 6 एअरबॅग्ज सारखी फीचर्स मिळतात. त्याचा लूक आणि डिझाइनही बदलण्यात आले होते.

मारुती सुझुकी बलेनोची किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 9.83 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन फेसलिफ्टेड मारुती बलेनोला 1.2-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते जे जास्तीत जास्त 89bhp पॉवर आउटपुट आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. यात पाच-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सेस मिळतात. त्यात सीएनजीचा पर्यायही आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की सीएनजी पॉवर हॅचबॅक 30.61 किमी/किलो इतकी इंधन कार्यक्षमता देऊ शकते.

हे पण वाचा :-  Mahindra Thar 5 Door : थार लव्हरसाठी मोठी बातमी ! ‘या’ दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5 डोअर ; जाणून घ्या सर्वकाही ..