Maruti Suzuki Electric Car : मारुती सुझुकी लॉन्‍च करणार पहिली इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जमध्ये धावणार 550 किमी, पहा फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Electric Car : सध्या देशातील ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार, बाईक्स आणि स्कूटर लॉन्‍च केल्या आहेत. मात्र सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी कंपनीकडून आतपर्यंत एकही इलेक्ट्रिक कार लॉन्‍च करण्यात आलेली नाही.

मात्र मारुती सुझुकी कंपनीची प्रत्येकच कार मायलेजच्या बाबतीत इतर कारला मागे टाकत आहे. त्यामुळे कार विक्रीच्या यादीत मारुती सुझुकी आजही अव्वल स्थानी आहे. मात्र मारुती सुझुकी कंपनीच्या कार खरेदी करणारे ग्राहक त्यांच्या इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत.

मारुती सुझुकी कंपनीकडून ऑटो एक्सपोमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली होती. आता ही कार लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार असणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या कार ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत त्यामुळे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद या कारला मिळत आहे. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील अधिक आहेत त्यामुळे अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही.

मात्र आता मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार स्वस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडणारी ही पहिली इलेक्ट्रिक कार ठरू शकते. २०२५ पर्यंत ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या इलेक्ट्रिक कारला टक्कर देईल असा दावा करण्यात आला आहे.

मारुती ईव्हीएक्सची चाचणी सुरू आहे. नुकतेच या कारच्या चाचणीदरम्यान प्रोटोटाइप मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. पोलंडमधील क्राको येथील चार्जिंग स्टेशनवर मारुती ईव्हीएक्स कार दिसली. एसयूव्ही भारतात बनवली जाईल आणि प्रथम येथे विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीकडून संयुक्तपणे ही कार टोयोटासोबत निर्मिती केली जात आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता लवकरच ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार मिळू शकते.

मारुती सुझुकी कंपनीच्या eVX इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कंपनीची eVX या इलेक्ट्रिक कार 4.3 मीटर लांब आणि 1600mm उंच असेल. त्यामुळे या SUV इलेक्ट्रिक कारचा ग्राउंड क्लीयरन्स देखील चांगला असण्याची शक्यता आहे.

या कारमध्ये SUV 360-डिग्री कॅमेरे, फ्रेमलेस रीअरव्ह्यू मिररसह येईल आणि ADAS तंत्रज्ञानासह ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस कंपनीचा आहे. मारुती eVX SUV कारमध्ये 60 kWh ची बॅटरी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 550 किमी पर्यंतची रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे.