Most Expensive Electric Cars In India : या आहेत भारतातील सर्वात महागड्या लक्झरी इलेक्ट्रिक कार! पहा रेंज आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Most Expensive Electric Cars In India : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांना पेट्रोल-डिझेल वाहने वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. हेच कारण पाहता अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत.

सध्या भारतीय ऑटो बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही.

अनेकजण नवीन कार खरेदी करताना कमी बजेटमध्ये कोणत्या कारमध्ये प्रीमियम फीचर्स येत आहेत हे पाहत असते. तसेच आता इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकजण स्वस्त इलेक्ट्रिक कार शोधत आहेत. मात्र कधी देशातील सर्वात महागड्या लक्झरी इलेक्ट्रिक कारचा विचार केला आहे का?

भारतीय ऑटो बाजारात सर्वाधिक महागड्या लक्झरी इलेक्ट्रिक कार देखील उपलब्ध आहेत. त्याबद्दल तुम्ही फार कमी ऐकले असेल. मात्र भारतात अशा ३ इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.

मर्सिडीज-बेंझ EQS 53

मर्सिडीज-बेंझ EQS 53
मर्सिडीज-बेंझ EQS 53

भारतीय ऑटो बाजारात Mercedes-Benz त्यांची सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. मर्सिडीज EQS 53 असे या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 2.45 कोटी रुपये आहे.

या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स देण्यात येतात. तसेच ही इलेक्ट्रिक कार प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सिंगल चार्जवर मर्सिडीज EQS 53 ही इलेक्ट्रिक कार 500 किलोमीटरहून रेंज देण्यास सक्षम आहे.

पोर्श टायकन ईव्ही

भारतातील दुसऱ्या सर्वात महागड्या लक्झरी इलेक्ट्रिक कारचे नाव Porsche Taycan आहे. या लक्झरी इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत 2.31 कोटी रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही प्रीमियम फीचर्स असलेली इलेक्ट्रिक कार 450 किमी पेक्षा जास्त रेंज देते. या कारमध्ये 93.4kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार 751 hp पॉवर आणि 1050 Nm टॉर्क निर्माण करते.

BMW i7

देशाच्या ऑटो बाजारातील तिसरी सर्वात महागडी लक्झरी इलेक्ट्रिक कार BMW i7 आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 1.95 कोटी रूपये इतकी आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 635 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये देण्यात आलेली मोटार 536 hp पॉवर आणि 745 Nm टॉर्क निर्माण सक्षम आहे. तसेच इलेक्ट्रिक कारमध्ये 101.7 kWh बॅटरी पॅक देण्यात येत आहे.