Punch CNG VS Aura CNG : टाटा मोटर्सची पंच CNG की ह्युंदाईची Aura CNG, तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punch CNG VS Aura CNG : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अधिक वाढल्याने अनेक नवीन वाहन खरेदीदार इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. तसेच सध्या अनेक कंपन्यांच्या कार ऑटो बाजारात उपलब्ध आहेत.

ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा मोटर्सची पंच कार सीएनजी सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक स्वस्त सीएनजी कार उपलब्ध झाली आहे. सध्या बाजारात ह्युंदाई मोटर्सच्या ऑरा सीएनजी कारला सर्वाधिक मागणी आहे.

बाजारात अनेक कंपन्यांच्या सीएनजी कार उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. मात्र आता कंपन्यांकडून ग्राहकांचा विचार करता अनेक स्वस्त सीएनजी कार बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत.

टाटा पंच CNG

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच पेट्रोल व्हर्जनमधील कार सीएनजी सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे. या कारमध्ये तीन सीएनजी सिलिंडर देण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सच्या सीएनजी कारचा व्हीलबेस 2,445 मिमी आणि उंची 1,615 मिमी आहे. तसेच कंपनीकडून या कारमध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आला आहे. कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सर्वोत्तम कार ठरू शकते.

टाटा मोटर्सचे पंच CNG कार इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवीन सीएनजी कारमध्ये 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 73.4 hp पॉवर आणि 103 nm टॉर्क जरेत करण्यास सक्षम आहे. ही कार 26.49km/kg मायलेज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

ह्युंदाई ऑरा

ह्युंदाई कंपनीची ऑरा सीएनजी कार सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. कारण ही एक स्वस्त आणि ग्राहकांच्या बजेटमधील सीएनजी कार आहे. या कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात येत आहेत.

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), रिव्हर्सिंग कॅमेरा अशी वैशिष्ट्ये या सीएनजी कारमध्ये देण्यक्त येत आहेत. तसेच ह्युंदाई ऑरा या सीएनजी कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि दोन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येत आहे. कंपनीकडून या कारमध्ये सहा मोनोटोन रंग पर्याय देण्यात येत आहेत.

ह्युंदाई ऑरा CNG इंजिन

ह्युंदाई कंपनीच्या ऑरा CNG कारमध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 81.8 Bhp पॉवर जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 8.13 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच ही कार 28 किमी/किलो मायलेज देते.