मोठी बातमी ! जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात लाँच होणार टाटा कंपनीची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक कार, किंमत किती राहणार ? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Electric Car : ह्या चालू नवीन वर्षात कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी ही जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात कंपनीच्या एका लोकप्रिय मॉडेलचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करणार आहे.

टाटा पंच इलेक्ट्रिकल कार ही लवकरच लॉन्च होणार आहे. खरे तर भारतीय बाजारात आधी देखील अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या आहेत. टाटाच्या देखील काही इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लॉन्च झाल्या आहेत. पण आतापर्यंत लॉन्च झालेल्या कार या खूपच महाग आहेत. यामुळे सर्वसामान्यांना इलेक्ट्रिक कार इच्छा असतानाही खरेदी करता येत नाही.

आता मात्र बाजारात टाटा पंच ही मिड बजेटमधील इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. आतापर्यंत टाटा कंपनीने तीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही गाड्यांना ग्राहकांनी विशेष प्रेम दाखवले आहे. टाटा म्हणजेच विश्वास असे समीकरण आहे. यामुळे टाटाच्या वाहनांना नेहमीच बाजारात पसंती मिळते. काही बोटावर मोजण्याइतके मॉडेल सोडले तर जवळपास टाटा कंपनीचे सर्वच मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरले आहेत.

दरम्यान टाटा आपली चौथी इलेक्ट्रिक कार बाजारात 17 जानेवारी 2024 ला लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे टाटा पंच इलेक्ट्रिक या गाडीसाठीची अधिकृत बुकिंग सुरू देखील झाली आहे. यामुळे ज्यांना ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांना लवकरात लवकर बुकिंग करावी लागणार आहे.

कुठे बुक करणार

मिळालेल्या माहितीनुसार टाटा पंच इलेक्ट्रिक कार बुक करण्यासाठी टाटाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. टाटा मोटर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि टाटा डीलरकडे जाऊन अवघ्या 21 हजार रुपयाच्या टोकन अमाऊंटमध्ये ही गाडी बुक करता येणार आहे.

किंमत किती राहणार ?

अजून ही गाडी अधिकृतरित्या लॉन्च झालेली नाही. यामुळे या गाडीची किंमतही समोर येऊ शकली नाही. मीडिया रिपोर्ट नुसार 17 जानेवारीला जेव्हा ही गाडी लॉन्च होईल तेव्हाच या गाडीची खरी किंमत समजू शकणार आहे. परंतु सध्या बाजारात जेवढ्या इलेक्ट्रिक कार आहेत त्यांच्या तुलनेत या कारची किंमत काहीशी कमी राहील असे मत व्यक्त होत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या कारची किंमत बारा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. कारण की या गाडीमध्ये अनेक अद्ययावत फीचर्स पाहायला मिळाले आहेत. या गाडीत असे काही फीचर्स आहेत जे आधीच्या पंच मध्ये नव्हते.