CNG Car Mileage: या गोष्टी करा आणि सीएनजी कारचे मायलेज मोठ्या प्रमाणात वाढवा! पैशांमध्ये होईल बचत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG Car Mileage:- कुठल्याही वाहनाची खरेदी करताना सगळ्यात अगोदर आपला बजेट, त्यानुसार त्या वाहनाचे असलेली किंमत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असलेले मायलेज या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. कारण या सगळ्या गोष्टींचा सरळ परिणाम हा आपल्या पैशांच्या बजेटवर होत असतो.

तसेच कार किंवा इतर वाहन घेतल्यानंतर चांगले मायलेज मिळावे याकरिता वाहनाची देखभाल देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने घेतली जाणे खूप गरजेचे असते. सध्या पेट्रोल व डिझेल यांच्या किमती वाढण्याच्या पार्श्वभूमीवर मायलेजला खूप जास्त महत्त्व आहे.

तसेच यामध्ये आता बऱ्याच व्यक्ती सीएनजी कारचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले असून या सीएनजीमध्ये देखील मायलेजचा अंतर्भाव होतो. त्यामुळे सीएनजी गाड्यांनी देखील चांगले मायलेज द्यायला हवे असे प्रत्येकाला वाटते.

तुमच्याकडे देखील सीएनजी कार असेल व तिने चांगले मायलेज द्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या लेखात आपण काही महत्त्वाच्या दिवस बघणार आहोत ज्या फॉलो केल्यानंतर सीएनजी कार चांगले मायलेज देऊ शकते.

 या टिप्स फॉलो करा आणि सीएनजी कारपासून चांगले मायलेज मिळवा

1- गाडीच्या क्लचची तपासणी करणे सीएनजी कार पासून चांगले मायलेज मिळावे किंवा मायलेज वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर कारचा क्लच नेहमी चांगल्या स्थितीमध्ये ठेवावा. क्लच जर घासलेला असेल तर कारचे मायलेज कमी करतो. त्यामुळे कमीत कमी कार्यक्षमता आणि जास्त इंधनाचा वापर देखील होतो व त्यामुळे साहजिकच कारचे मायलेज कमी होते.

2- ट्रान्समिशन फ्ल्यूडची तपासणी सीएनजी कारचे मायलेज वाढवायचे असेल तर वेळोवेळी ट्रान्समिशन फ्लूइड तपासणे खूप गरजेचे आहे. हे काम तुम्ही घरी करू शकत नाही याकरिता तुम्हाला मेकॅनिकची आवश्यकता भासते व मेकॅनिकच्या माध्यमातूनच तुम्ही ट्रान्समिशन फ्लूइड तपासण्याचा प्रयत्न करू शकतात.

3- एअर फिल्टरची स्वच्छता सीएनजी हा हवेपेक्षा खूपच हलका असतो व त्यामुळे कारचे एअर फिल्टर जर अस्वच्छ किंवा त्यामध्ये घाण असेल तर हवा- इंधन मिश्रण ज्वलन समस्या येऊ शकते. यामुळे इंजिन वर दबाव तर पडतोच परंतु इंधनाचा वापर देखील वाढतो. त्यामुळे कारचे एअर फिल्टर स्वच्छ ठेवावे आणि वेळोवेळी मेकॅनिक कडून त्याची तपासणी करून घ्यावी. तसेच दर पाच हजार किलोमीटर वरती बदलणे गरजेचे आहे.

4- टायरचा प्रेशर तपासणे सीएनजी कारचे मायलेज चांगले ठेवण्यासाठी टायर हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. सीएनजी कारच्या टायरमधील हवा कमी असेल तर गाडी चालताना रबर आणि रस्ता यांच्यामधील घर्षणात वाढ होते व त्यामुळे कारच्या इंजिनवर दबाव येतो. त्यामुळे गाडीच्या टायरचा दाब कायम ठेवणे गरजेचे आहे व त्यामुळे कारचे मायलेज देखील वाढते.

5- स्पार्क प्लगची देखभाल सीएनजी कारला इंजिन मधील प्रज्वलन प्रक्रियाकरिता मजबूत अशा स्पार्क प्लगची आवश्यकता असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे स्पार्क प्लग वापरणे खूप महत्त्वाचे असते. कारण सीएनजी कारमध्ये प्रज्वलन तापमान हे पेट्रोल कारच्या तुलनेमध्ये जास्त असते त्यामुळे या कारमध्ये मजबूत स्पार्क प्लगची आवश्यकता भासते.