Maharashtra Cotton Market : कापसाचे भाव शेतकऱ्यांना तारणार की मारणार? काय राहील कापूस भावाची स्थिती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Cotton Market : कापूस आणि सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील संपूर्ण आर्थिक गणित हे या दोन पिकांवर अवलंबून असते. कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते. प्रामुख्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबार, मराठवाड्यातील काही जिल्हे तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड होत असते.

यावर्षीच्या हंगामामध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर दडी मारल्यामुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी कापूस उत्पादनामध्ये घट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामधून जो कापूस शिल्लक आहे त्या कापसाची विदर्भ तसेच मराठवाडा व खानदेश पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन कापसाची वेचणी सुरू झाली असून काही बाजारपेठांमध्ये आता नवीन कापूस विक्रीसाठी दाखल देखील झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी कापसाला किती भाव मिळेल? याबाबतची उत्सुकता असून त्याच अनुषंगाने आपण या लेखात कापूस भावाची स्थिती काय राहू शकते? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेणार  आहोत.

कशी आहे कापूस दराची स्थिती?

बऱ्याच ठिकाणी आता नवीन कापसाची काढणी सुरू झालेली असून काही बाजारपेठेमध्ये कापसाची आवक देखील सुरू आहे. परंतु जर आपण कापसाची सुरुवात पाहिली तर हमीभावापेक्षा देखील कमी दर मिळताना दिसून येत आहे. जर आपण 2023 24 या हंगामाचा विचार केला तर यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला सहा हजार  रुपये प्रतिक्विंटल तर लांब धाग्या करिता सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

परंतु एवढा दर हा काही ठिकाणीच मिळताना दिसून येत आहे. मागच्या वर्षी आपण याच कालावधीचा किंवा नोव्हेंबर चा विचार केला तर कापूस दर हा आठ हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होता व 2021 मध्ये याच कालावधीत दहा हजाराचा टप्पा पार केला होता. परंतु यावर्षी काय स्थिती राहू शकते याबद्दल अजून तरी देखील स्थिती स्पष्ट होताना दिसून येत नाही.

 कापूस लागवडीची स्थिती काय आहे?

यावर्षी राज्यामध्ये खरीप हंगामात 42.34 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे व 17 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100% पाऊस झाला आहे. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने दडी मारल्यामुळे कापूस पिकावर त्याचा खूप विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. कापसाची वाढ तर खुंटलीच परंतु पांढरी माशी व बोंड अळीसारखे कीटकांचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट येईल अशी सध्या स्थिती आहे.

 सध्या देशातील बाजारपेठेत कापसाचे भाव कसे आहेत?

सध्या देशातील बाजारपेठेत कापसाचे भाव स्थिर असताना दिसून येत असून काही बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाच्या कापसाला 6500 ते 7500 पर्यंत दर मिळत आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही ठिकाणी परतीच्या पाऊस पडल्यामुळे कापसामध्ये ओलावा असून त्यामुळे भाव कमी आहेत असे देखील या क्षेत्रातील तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

यावर्षी नवीन कापसाला पाच हजारापासून दर मिळताना दिसून येत आहे व हा दर हमीभावापेक्षा देखील खूप कमी आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी बाजारभावाची स्थिती पाहून टप्प्याटप्प्याने कापूस बाजारपेठेत विक्रीकरिता आणला होता व त्यामुळे हमीभावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा किंचित जास्तीचा बाजार भाव मिळाला होता. असे देखील या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

 यावर्षी कापूस पिकाचे झाले आहे नुकसान

यावर्षी पावसाची सुरुवात उशिरा झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कापसाची लागवड खूप लेट झाली आहे तसेच ऑगस्ट व जुलैमध्ये पावसाने खूप मोठा खंड दिल्यामुळे याचा फटका हा महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील कापूस पिकाला बसला आहे. यामुळे कापसाची गुणवत्ता व उत्पादकता यामध्ये विपरीत परिणाम झाला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमीत कमी 20 टक्के तरी जास्तीचा दर मिळेल अशी अपेक्षा आहे.

सध्या कापसामध्ये ओलावा असल्यामुळे बाजारभाव कमी असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत असले तरी काही दिवसांनी ओलावा कमी झाल्यानंतर कमीत कमी भावांमध्ये सुधारणा होईल असे देखील जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जर कापसाचे आवक वाढली तर यापेक्षा देखील कापसाचे दर खाली येऊ शकतात अशी देखील शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

 यावर्षी कापूस बाजार कसा राहील? काय म्हणतात तज्ञ?

जर आपण याबाबतीत ज्येष्ठ शेती अभ्यासक विजय जावंधिया यांचे मत पाहिले तर त्यांच्या मते सध्या कापसाची आवक कमी प्रमाणात आहे. परंतु डिसेंबर मध्ये महाराष्ट्र व गुजरात मध्ये कापसाचे आवक वाढली तर कापसाचे दर कमी होतील अशी शक्यता आहे.

तसेच जागतिक अर्थव्यवस्थेचा देखील परिणाम हा कापूस बाजारपेठेवर होत असतो. कापसाची आयात करायची राहिली तर त्यासाठी वाहतूक खर्च येतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतच स्वस्तामध्ये कापूस मिळाला तर आयात कमी होईल. याच अनुषंगाने कापसाचे भाव हे हमीभावापेक्षा कमी व्हायला नकोत म्हणून राज्य सरकारकडून आत्ताच सीसीआय अर्थात कापूस महामंडळाच्या मार्फत कापूस खरेदीसाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरायला हवा असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेले आहे.