Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 16-12-2021

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आतापर्यंत शेतकऱ्यांना आत्मविश्वास होता की, सोयाबीनच्या दरात ही वाढ होणार मात्र, आता सोयापेंड आयातीला स्थगिती देऊनही त्याचा परिणाम दरावर झालेला नाही. उलट सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 200 वर सोयाबीन हे स्थिरावले होते पण गुरुवारी 200 रुपयांची घसरण झाली आहे.

सोयापेंड आयातीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर दरात वाढ होईल असे चित्र होते. पण वाढ तर सोडाच आता दर हे स्थिरही राहत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याचा दर भविष्यातही राहतो की नाही त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.

यंदा उन्हाळी हंगामातही सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनाचा प्रयोग उन्हाळी हंगामात केला जात होता.

यंदा मात्र, पाण्याची उपलब्धता आणि रब्बी हंगामातील लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिलेला आहे. शिवाय मध्यंतरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा आहे.

यंदा कधी नव्हे तेच उन्हाळी हंगामातील पेरा हा वाढलेला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली तर मात्र, सोयाबीनचे दर अणखीन घसरणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहेच.

आता सोयाबीनची आवक वाढली असतानाही मागणी घटली आहे. मध्यंतरी शेतकरी हे साठवणूकीवर भर देत होते. पण आता घटत्या दरामुळे सोयाबीनचे भवितव्य काय राहणार यामुळे विक्रीवर भर दिला जात आहे.

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 16 डिसेंबर 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 16-12-2021)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

सोयाबीन बाजारभाव 16-12-2021 Last Updated On 06:28 PM

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
16/12/2021 अहमदनगर क्विंटल 132 5800 6271 6138
16/12/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 300 4500 6385 6276
16/12/2021 अकोला पिवळा क्विंटल 3851 5755 6738 6328
16/12/2021 अमरावती क्विंटल 510 5800 6300 6050
16/12/2021 औरंगाबाद क्विंटल 110 5775 6175 5975
16/12/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 46 5600 6050 5887
16/12/2021 बीड क्विंटल 1147 5351 6338 6175
16/12/2021 बीड पिवळा क्विंटल 196 5501 6300 6177
16/12/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 830 5500 7100 6450
16/12/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 1199 5668 6424 6183
16/12/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 173 5000 6400 6162
16/12/2021 धुळे हायब्रीड क्विंटल 6 4000 6200 6200
16/12/2021 हिंगोली लोकल क्विंटल 500 5800 6200 6000
16/12/2021 जळगाव पिवळा क्विंटल 17 5800 6285 6285
16/12/2021 जालना पिवळा क्विंटल 1085 5425 6200 6050
16/12/2021 लातूर पिवळा क्विंटल 6048 6060 6513 6322
16/12/2021 नागपूर लोकल क्विंटल 811 5000 6321 5991
16/12/2021 नागपूर पिवळा क्विंटल 106 4885 5966 5365
16/12/2021 नांदेड क्विंटल 29 6000 6412 6381
16/12/2021 नांदेड पिवळा क्विंटल 113 5625 6131 5878
16/12/2021 नाशिक क्विंटल 507 3000 6425 6300
16/12/2021 नाशिक पांढरा क्विंटल 517 4000 6421 6361
16/12/2021 परभणी नं. १ क्विंटल 175 5825 6200 6000
16/12/2021 परभणी पिवळा क्विंटल 197 6150 6398 6202
16/12/2021 वर्धा पिवळा क्विंटल 2814 4306 4679 4478
16/12/2021 वाशिम पिवळा क्विंटल 6000 5500 6711 6150
16/12/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 698 5433 5632 5550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 28117