Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांमागची साडेसाती काही संपेना ! सोयाबीन दरात घसरण सुरु ; सोयाबीन बाजारभाव वाढतील का ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रासह देशांत दिवाळी पर्वाला सुरुवात झाली आहे. दिवाळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर सोया तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून सोयाबीन तेलाचे बाजार भाव (Soya oil rate) वधारले आहेत.

शिवाय शेतकरी बांधवांनी देखील दिवाळी सण साजरी करण्यासाठी पैशांची चणचण भासू नये या अनुषंगाने सोयाबीन बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची बाजारपेठेत मोठी विक्रमी आवक होत आहे. एकीकडे सोया तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत तर दुसरीकडे सोयाबीन बाजार भाव (Soybean Rate) जसे होते तसेच आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे भाव तब्बल वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत तसेच सोया तेलाचे भाव देखील तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच सोयाबीन तेल लीटरमागे 10 रुपयांनी वाढले आहे. सोयाबीन तेलाचे बाजार भाव आकाशाला गवसणी घालत आहेत मात्र सोयाबीन बाजारभाव (Soybean Market Price) अजूनही वाढत नसल्याचे चित्र आहे यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे दर मागील आठवड्यापासून 200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र ज्या सोयाबीनचा (Soybean Crop) दर्जा खालावला आहे तसेच पावसामध्ये तापलेले सोयाबीन मात्र कमी बाजार भावात विक्री होत आहे. चांगल्या दर्जाचा सोयाबीन बाजारात पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढेच विक्री होत असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे.

दरम्यान कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रक्रिया उद्योग आपल्या गरजेपुरता सोयाबीन खरेदी करत आहे. खरं पाहता सोया तेलाला मागणी बाजारात मोठी आली आहे. मात्र सणाच्या दिवसात बाजारात ह्या तेलाला मागणी असली तरी देखील मागणी प्रमाणेच सोयाबीन गाळप केले जात आहे. वायदे सुरू असते तर कदाचित मेल समिती सोयाबीन तेलाचे अधिक गाळप केले असते आणि वायद्यात विक्रीसाठी पाठवले असते.

यामुळे सध्या बाजारात मागणीनुसार सोयातेलाची निर्मिती केली जात आहे. परिणामी बाजारात सोयाबीनला गरजेपुरताच खरेदी केले जात आहे आणि शेतकरी बांधवांना गरज असल्याने सोयाबीन बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. यामुळे मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला असल्याने सोयाबीनच्या बाजारभावात अजूनही घसरण पाहायला मिळतात. दरम्यान शेतकरी बांधवांनी असा आरोप लगावला आहे की, व्यापारीवर्ग सोयाबीन डागी असल्याचे तसेच सोयाबीनमध्ये आद्र्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत सोयाबीनचे बाजार भाव हाणून पाडत आहेत.

रम्यान दिवाळीच्या सणाला शेतकरी बांधवांना सोयाबीनची विक्री करणे आता निकडीचे बनले आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना एक अनमोल सल्ला देखील यावेळी दिला आहे. जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी नवीन सोयाबीन काढणी केल्यानंतर सोयाबीन चांगले वाळवून बाजारात विक्रीसाठी आणावे तसेच सोयाबीनमध्ये घाण कचरा व्यवस्थित रित्या व्यवस्थापित केल्यास शेतकरी बांधवांचा सोयाबीन चांगल्या भावात विक्री होऊ शकतो.

सध्या सोयाबीन बाजारात पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते 5200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. तसेच जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत एफएक्यू सोयाबीनचा बाजारभाव गृहीत धरून सोयाबीन विक्री करणे सुरू ठेवले पाहिजे.