Soybean Market Price: सोयाबीन विक्रीचा प्लॅन आखताय ना..! मग 17 ऑगस्टचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घ्या मगच विक्रीच नियोजन आखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price: मित्रांनो राज्यात सोयाबीन (Soybean Crop) या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जात आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तसेच खानदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेती बघायला मिळते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सोयाबीन उत्पादनात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) कायमच सोयाबीनच्या बाजार भावाकडे लक्ष ठेवून असतात. आपण देखील आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी रोजच सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Rate) घेऊन हजर होत असतो. मित्रांनो चला तर मग वेळ न दवडता जाणून घेवूया 17 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख एपीएमसी मधील सोयाबीनचे ताजे बाजार भाव.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- मित्रांनो कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 4 हजार 300 क्विंटल एवढे आवक नमूद करण्यात आली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमीत कमी पाच हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. जास्तीत जास्त बाजार भाव 6160 एवढा राहिला. सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 975 येवढा या वेळी नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 182 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज नागपूर एपीएमसी मध्ये सोयाबीन ला कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. आज या एपीएमसीमध्ये जास्तीत जास्त बाजार भाव 6150 एवढा होता. सर्वसाधारण बाजार भाव 6012 एवढा या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती:- हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 213 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये कमीत कमी बाजार भाव 5600 एवढा राहिला, तर जास्तीत जास्त बाजार भाव 6080 एवढा नमूद करण्यात आला. सर्वसाधारण बाजार भाव 5840 येवडा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 261 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमीत कमी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 165 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 890 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती:- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 376 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी बाजार भाव 5730 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला. जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 100 एवढा नमूद करण्यात आला. सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 915 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनचा आज या बाजार समितीत मिळाला.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती:- बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 25 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी पाच हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. तसेच जास्तीत जास्त बाजार भाव देखील 5850 आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील एवढाच राहिला.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती:- पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत कमीत कमी बाजार भाव 5851 तसेच जास्तीत जास्त बाजार भाव देखील एवढाच राहिला आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील एवढाच होता.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती:– भोकर एपीएमसीमध्ये आज 67 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 3800 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता तर सर्वसाधारण बाजार भाव 4900 एवढा नमूद करण्यात आला आहे.