Soybean Market Price : सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घ्या, मगच सोयाबीन बाजारात पाठवण्याचा प्लॅन आखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सर्वप्रथम तमाम शेतकरी बांधवांना (Farmer) बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यात सोयाबीन (Soybean Crop) या नगदी पिकांची (Cash Crops) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे अर्थकारण हे सोयाबीन या पिकावर अवलंबून असते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधवाचे कायमच सोयाबीनच्या बाजार भावाकडे (Soybean Rate) बारीक लक्ष असते.

आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनचे ताजे बाजार भाव घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण 26 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.

चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे बाजार भाव सविस्तर. मित्रांनो आज महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर फक्त तीन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावाची माहिती देण्यात आली आहे. म्हणजे आज फक्त तीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव झाला आहे.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला कमीत कमी पाच हजार 181 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजारभाव देखील तेवढाच राहिला. सर्वसाधारण बाजार भाव देखील या बाजार समितीत तेवढाच नमूद करण्यात आला आहे.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- तासगाव एपीएमसीमध्ये आज 33 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला 6040 रुपये प्रतिक्‍विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव सहा हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव सहा हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 28 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला किमान पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला असून कमाल बाजार भाव पाच हजार 454 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार 427 रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे.