Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावात सुधारणा..! कसा राहणार यंदा सोयाबीन बाजार, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादित केले जाणारे मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता सोयाबीन हे नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते.

गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहिती नुसार, यावर्षी देशांतर्गत सोयाबीनचा मुबलक साठा शिल्लक असल्याने सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Bajarbhav) मिळणार आहे.

राज्यात सध्या सोयाबीन पिकाला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासचं बाजार भाव मिळत आहे. आगामी काळात देखील असाच बाजार भाव कायम राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 132 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 635 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन दर मिळाला असून पाच हजार 151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 490 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 40 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 300 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4351 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 70 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 860 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 125 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला नमूद करण्यात आला आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती :- सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 150 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 390 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज 2944 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 271 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 120 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 597 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 153 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 755 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज चार हजार 865 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 259 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4290 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 895 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.