Soybean Market Price : चिंताजनक! आवक कमी तरीही सोयाबीन दरात घसरण; आजचे सोयाबीन बाजाभाव जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे राज्यातील एक प्रमुख पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अर्थकारण अवलंबून आहे.

मात्र या नगदी पिकाने आता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना अक्षरश रडवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडल्या.

सोयाबीनला सध्या काही ठिकाणी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव (Soybean Bajarbhav) मिळत असून अनेक ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढाचं सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे. मित्रांनो सोयाबीनला आज सहा सप्टेंबर रोजी कोणत्या बाजारात काय भाव मिळाला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- मित्रांनो सोयाबीनच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या कारंजा एपीएमसीमध्ये आज 1500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये 5255 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून चार हजार 770 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आजचे एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये 1626 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला पाच हजार 140 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 920 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- नागपुर एपीएमसीमध्ये आज 244 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4870 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये सोयाबीनची 3076 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 491 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 381 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. साध्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 210 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 130 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसीमध्ये आज 1500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.